आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी सोडत‎:साक्रीमध्ये 17 नवीन‎ ग्रामपंचायतींची निर्मिती‎

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎ साक्री तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ‎ ‎ विभाजन करून नवीन १७ ‎ ‎ ग्रामपंचायतीची निर्मिती करण्यात‎ आली आहे. या ग्रामपंचायतीपूर्वी ‎ ‎अस्तित्वात असलेल्या‎ ग्रामपंचायतीचे मूळ सरपंचपदाची ‎ आरक्षण साेडत यापूर्वी काढण्यात ‎ ‎आली हाेती. नवनिर्मित १७ ‎ ‎ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची ‎ ‎ आरक्षण साेडत साेमवारी (दि.७) ‎काढण्यात येणार आहे.

त्यात १७‎ पैकी ९ ग्रामपंचायतीचे सरपंचपद ‎ ‎ महिलांसाठी राखीव आहे.‎ आरक्षण सोडतीसाठी‎ उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील‎ यांनी तहसीलदारांची पीठासीन‎ अधिकारी म्हणून नियुक्ती केली‎ आहे. शासनाच्या नियमानुसार ५०‎ टक्के जागा महिलासाठी राखीव‎ आहे. साक्री तालुक्यातील‎ अनुसूचित क्षेत्रातील मुळ १०‎ ग्रामपंचायतीचे विभाजन करून‎ नव्याने १७ ग्रामपंचातींची निर्मिती‎ करण्यात आली आहे. मूळ‎ ग्रामपंचायती अनुसूचित क्षेत्रातील‎ असल्याने सन २०२० ते २०२५ मध्ये‎ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे‎ सरपंचपदाचे आरक्षण निश्चित‎करून दिले हाेते.

नियमातील‎ तरतुदीनुसार एकूण संख्येच्या एक‎ द्वितीयांश यथास्थितीत अनुसूचित‎ जमातीच्या महिलांसाठी राखीव‎ ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार‎ नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या‎ सरपंचपदाच्या महिला आरक्षण‎ साेडतीसाठी साक्री तहसील‎ कार्यालयात ७ नाेव्हेंबरला सकाळी‎ साडेदहा वाजता सभा हाेणार आहे.‎ या वेळी १७ पैकी ९ ग्रामपंचातयींच्या‎ सरपंचपदासाठी महिलांचे आरक्षण‎ काढण्यात येणार असल्याची माहिती‎ देण्यात आली. सोडत काढण्यासाठी‎ आवश्यक तयारी पूर्ण करण्यात‎ आली आहे.‎

साक्री तालुक्यात आहे‎ नवीन ग्रामपंचायती....‎
जयराम नगर-कैलासनगर,‎ पुनाजीनगर-कुत्तरखांब ,शिवाजी‎ नगर-बागुल नगर,हनुमंतनगर,‎ राईनपाडा,मल्या चा पाडा,गव्हाणीपा‎ डा-माळपाडा,बाे ढरीपाडा,‎ चिंचपाडा,महुबं द,पाेखारे-आेझ रदे,‎ हाेळ्याचा पाडा,म्हाळ्याच ा पाडा,‎ हारपाडा-स ांडेर,खट्याळ-व र्दळी,‎ चावडीपाडा,पिंझारझाडी-साबरसाेंडा.‎

बातम्या आणखी आहेत...