आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:शहीद जवानावर अंत्यसंस्कार; मुलाने दिला मुखाग्नी, स्मारक उभारले जाणार

धुळे10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चिंचखेडा येथील शहीद जवान मनाेज गायकवाड यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी शासकीय इतमात अंत्यसंस्कार झाले. पोलिस व सैन्य दलाच्या तुकडीने हवेत तीन गोळ्या झाडून मानवंदना दिली. फुलांनी सजवलेल्या वाहनात मनोज गायकवाड यांचे पार्थिव ठेवले होते. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. शहीद जवान गायकवाड यांचे गावात स्मारक उभारण्याची घोषणा आमदार कुणाल पाटील यांनी केली.

जवान मनाेज गायकवाड यांचेे पार्थिव रविवारी रात्री रेल्वेने मुंबई व तेथून विशेष वाहनाने हिरे मेडिकल काॅलेजमध्ये आणले. त्यानंतर सोमवारी सकाळी पार्थिव गावात नेण्यात आले. फुलांनी सजवलेल्या वाहनातून मनोज गायकवाड यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघाली. खासदार डाॅ.सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, आमदार कुणाल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, सैन्य दलातर्फे मेजर अभिषेक कंसारा आदी उपस्थित होते. मनोज गायकवाड यांच्या मुलाने मुखाग्नी दिला.

एक हजार फुटाचा तिरंगा...
अंत्ययात्रेत शाळेतील विद्यार्थी एक हजार फूट लांबीच्या तिरंग्यासह सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...