आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:रेशन धान्याची काळाबाजारात विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील चितोड रोड परिसरातील रेशन धान्य दुकानदाराने गरजूंना धान्य वाटप न करता त्याची काळ्या बाजारात विक्री केली. याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जे. डी. मुकुंदे यांच्या नावाने रेशन दुकान आहे. शासनाच्या वतीने गरजू नागरिकांना वाटप करण्यासाठी दिलेले धान्य मुकुंद ए. यांच्या दुकानात होते. परंतु गरजूंना धान्याचे वाटप न करता सचिन ब्राह्मणकर याच्या मदतीने ते परस्पर काळा बाजारात विक्री करण्यात आले. पुरवठा निरीक्षक छोटू श्रावण चौधरी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.