आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:शिरपूर तालुक्यातील लोंढरे अन् तऱ्हाडीत दंगलीचा गुन्हा ; राग येऊन  मारहाण केली

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लोंढरे आणि तऱ्हाडीत किरकोळ कारणांमुळे मोठे वाद झाले. वादाचे पर्यवसान दंगलीत झाल्याने शिरपूर पोलिस स्थानकात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढरे गावातील विशाल अशोक भील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तापी नदीपात्राजवळ मजुरांना घेऊन कामावर गेलो. त्या ठिकाणी वाळूत फसलेले ट्रॅक्टर बाजूला करण्यास सांगितले असता त्याचा राग येऊन मारहाण केली. त्यावरून विकी कोळी, चेतन कोळी, अशोक कोळी, गुड्डू कोळी, भय्या कोळी, मंजू साळवे, अप्पा कोळी, विलास कोळी, विजय कोळी, अण्णा कोळी, करण कोळी आणि धीरज कोळी (सर्व रा. लोंढरे) अशा एकूण १३ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत, तऱ्हाडी येथील जिजाबराव गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेतात ठिबक सिंचनाच्या नळ्या अंथरत असताना नितीन अर्जुन करंके हा मला त्याच्या कामासाठी बोलावू लागला. मात्र माझे काम बाकी असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले म्हणून नितीन अर्जुन करंके, शीतल करंके, अरुण करंके, रवींद्र करंके आणि अर्जुन सुकलाल करंके (सर्व रा. तऱ्हाडी) या पाच जणांनी लाठीकाठीने मारहाण केली. म्हणून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पोलिस वेळेच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

बातम्या आणखी आहेत...