आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Crisis On Farmers It Became Difficult To Survive Onion In Chali Till Dussehra Diwali; Onion Stored In Chali Affected Due To Continuous Rain, Bad Weather| Marathi News

कांदा संकटात:शेतकऱ्यांवर संकट  दसरा दिवाळीपर्यंत चाळीत कांदा टिकणे झाले मुश्कील; संततधार पाऊस, खराब हवामानामुळे चाळीत साठवलेल्या कांद्यास फटका

तऱ्हाडी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा-वीस दिवसांपासून जिल्हाभरात सुरू असलेल्या संततधार पावसाने खरीप पिकाला फटका बसलेला असताना शेतकऱ्यांची एकमेव आशा असलेल्या उन्हाळी कांद्यालाही संततधार पावसाचा फटका बसला असून चाळीत साठवलेला कांदा संकटात सापडला आहे.

दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी भाववाढीच्या आशेने उन्हाळी कांदा दसरा, दिवाळीपर्यंत साठवून ठेवत असतात, पण यावर्षी मात्र दोन महिने अगोदरच शेतकऱ्यांचा कांदा हा खराब झाला असून, मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच अगोदरच उन्हाच्या चटक्यात सापडलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी खराब झाली तर नाफेडने थांबवलेली खरेदी या कारणामुळे कांद्याच्या दरात घसरण होऊन कांद्याला सरासरी ८०० ते १००० च्या आसपास भाव मिळत असल्याने त्यातून खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. जुलै महिन्यात गेली पंधरा-वीस दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. परिणामी खरिपातील मका, कापूस,भाजीपाला वर्गीय पिके खराब झालेली असतानाच दमट हवामानाचा आणि गारव्याने चाळीतील कांदा खराब होत असून, हे प्रमाण ऑगस्ट महिन्यात वाढणार आहेत.

शेतकरी दुहेरी संकटात
आधी उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सततच्या पावसामुळे चाळींमधील साठवलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडण्यास सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांचा निम्म्यापेक्षा जास्त कांदा सडला असून, भावही नाही तर दुसरीकडे चाळींतील कांदा सडत आहे.
तुळशीराम भामरे, उपाध्यक्ष शिरपूर शेतकरी संघर्ष समिती

कवडीमोल भावात कांदा विक्री
ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात फोडल्या जाणाऱ्या कांदा चाळी यावर्षी मात्र खराब हवामानामुळे कांदा सडत असल्याने दोन महिने अगोदरच फोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे आहे त्या भावात कांदा विक्री करत आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांना खरीप पिके उभी करण्यासाठी खते, औषधे खरेदी करण्यासाठी भांडवलाची चिंता भेडसावत असल्याने आहे, त्या भावात कांदा विक्री करत आहे.
मनोज पंडित देसले, शेतकरी, भटाणे

बातम्या आणखी आहेत...