आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १०३ टक्के पाऊस झाला. धुळे आणि साक्री तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त तर शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात कमी आहे. त्यातही शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा, चिमठाणे, शिरपूर तालुक्यातील जवखेडा, होळनांथे मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. या भागात उन्ह वाढल्याने पिके करपू लागली आहे. दुसरीकडे साक्री तालुक्यातील काही भागात जास्त पावसामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडण्याचा धोका आहे.
जिल्ह्यातील ३९ मंडळापैकी १६ मंडळांत १०० टक्के पेक्षा अधिक तर साक्री तालुक्यातील दोन मंडळात २०० टक्के पेक्षा जास्त, पाच मंडळात ७० टक्के पेक्षा कमी पाऊस झाला आहे. अवर्षणग्रस्त ओळख असलेल्या शिंदखेडा तालुक्यात ७५ टक्के पाऊस झाला आहे. वर्षी मंडळातील टेमलाय, निरगुडी, दसवेल, अजंदे, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे गावात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. उन्हाचा तडखा वाढल्याने पिके करपू लागली आहे. परिसरातील नाले, ओंढे, गाव तलाव अद्याप कोरडे आहे. दुसरीकडे साक्री तालुक्यातील ज्या मंडळात जास्त पाऊस झाला आहे. तेथील शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पिके सडण्याचा धोका आहे.
अतिवृष्टीने ४१८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
साक्री तालुक्यात शेतात पाणी असल्याने कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजारी आदी पिके सडण्याचा धोका आहे. हे चित्र म्हसदी, साक्री, पिंपळनेर, कुडाशी या भागात हा धोका वाढला आहे. तसेच याच तालुक्यात अतिवृष्टीने ४१८ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.
मंडळात २००% पाऊस
जिल्ह्यात सर्वात कमी ५२ टक्के पाऊस जवखेडा मंडळात झाला आहे. मंडळनिहाय पाऊस असा : नरडाणा ५४.७ टक्के, होळनांथे ६३.५ टक्के, चिमठाणे ६७.७ टक्के, सोनगीर ६९.८ टक्के, वर्षी ७० टक्के ,खलाणे ७१.५, उमरपाटा २५१.८ टक्के, कुडाशी २१४.८ टक्के, ब्राम्हणवेल १९४.८ टक्के, दहिवेल १७५.७ टक्के, कासारे १८८.७ टक्के, साक्री १५८.७ टक्के, पिंपळनेर १५७.२ टक्के, म्हसदी १३८.५, धुळे ११९.८ टकके, आर्वी १२५.१ टक्के, फागणे ११९.८ टक्के, मुकटी १२९.१ टक्के.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.