आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ:परीक्षार्थीला मारल्याचा आरोप करत जमाव थेट परीक्षा केंद्रात

धुळे2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जयहिंद शाळेतील प्रकार, शिक्षकांना शिवीगाळ, दमदाटी

दहावीचा शनिवारी इंग्रजीचा पेपर झाला. पेपर सुटल्यावर शहरातील जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रात नागरिकांचा जमाव आला. या वेळी केंद्रातील शिक्षकांना शिवीगाळ व दमदाटी झाली. पेपर सुरू असताना एका शिक्षिकेने परीक्षार्थीला मारल्याचा आरोप पालकांनी केला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस आले. त्यांनी जमावाला पांगवले. पण परिस्थिती नियंत्रणात येण्यापूर्वीच पोलिस निघून गेले. त्यानंतर शिक्षकांनी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी एक ते दीड तास गोंधळ सुरू होता.

दहावीच्या पेपर दरम्यान पालकांना परीक्षा केंद्राच्या आवारात येण्यास मज्जाव आहे. त्यानंतरही शनिवारी दुपारी दोन वाजता इंग्रजीचा पेपर सुटल्यावर काही नागरिकांचा जमाव शहरातील जयहिंद शाळेतील परीक्षा केंद्रात शिरला. या वेळी शिक्षकांना शिवीगाळ व दमदाटी झाली. घटनेनंतर तातडीने पोलिस आले. त्यांनी जमावाला पांगवले. वातावरण शांत होईपर्यंत पोलिसांनी थांबणे आवश्यक असताना काही वेळाने पोलिस निघून गेले. पोलिस गेल्यावर काही पालक पुन्हा केंद्रात आले. तोपर्यंत बारावीचा पेपर सुरू झाला होता. या वेळी काही पालकांनी शिक्षकांनी परीक्षार्थींना मारल्याचा आरोप केला. एक तास गोंधळ सुरू होता. शाळेतील शिक्षकांनी पालकांची समजूत काढली.

शिक्षकांमध्ये दहशत : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांना अतिरिक्त पोलिस बंदोबस्त द्यावा अशी मागणी जयहिंद हायस्कूलच्या केंद्र संचालकांनी यापूर्वी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. याविषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालकांची चिंताही रास्त
परीक्षेमुळे मुले तणावात आहे. विद्यार्थी कॉपी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण पेपर सुरू असताना विद्यार्थ्याला शिक्षकांनी मारहाण करणेही चुकीचे आहे. त्यातून मुलांची मानसिकता बिघडू शकते. त्यामुळे शिक्षकांनी काळजी घ्यावी, अशी मागणी पालकांनी केली.

बातम्या आणखी आहेत...