आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे मंगळवारी पावसाळ्यापूर्वी आठवडे बाजारात सर्वसामान्य नागरिक, शेतमजूर तसेच मजुरांनी, आदिवासी बांधवांनी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शहादा येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. आठवडे बाजारात नेहमीप्रमाणे मजूरवर्ग, आदिवासी बांधव, बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, शेतीत काम करणारे शेतमजूर, सुटी घेऊन बाजार करण्यासाठी येत असतात. साधारणत: किराणा, जीवनावश्यक वस्तू, कपडे, इतर साहित्य खरेदी करत असतात. दर मंगळवारी मजुरांना मजुरी मिळत असते. दिवसभर आठवडे बाजारात थांबून सायंकाळी घरी परततात. दिनांक सात जून रोजी मंगळवारी पावसाळा सुरू होण्यापूर्वी विविध वस्तू साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पावसाळ्यापासून बचाव करण्यासाठी घराच्या छतावर टाकण्यासाठी प्लास्टिकचे कागद, चपला, बूट, कपडे, मसाल्याचे पदार्थ, मातीचे माठ, असे साहित्य खरेदी करताना दिसत होते. शहरातील नगरपालिका कार्यालयाच्या इमारतीला लागून, महात्मा गांधी पुतळा, चार रस्ता, पाण्याच्या टाकी जवळ, जनता चौक, नगरपालिकेसमोरील चौकात, छोट्या-मोठ्या दुकानी, हातगाड्या लावलेल्या होत्या. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. वाहनांची वर्दळ सुरू होती. पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. एकत्रित आठवडे बाजाराला चांगला प्रतिसाद दिसून आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.