आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन‎:सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंतांना बक्षीस

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील एसव्हीकेएम अभियांत्रिकी‎ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन‎ झाले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध‎ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.‎ त्याचबराेबर कार्यक्रमात गुणवंत‎ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात‎ आला.‎ कार्यक्रमाला अप्पर पोलिस‎ अधीक्षक किशोर काळे,‎ एसव्हीकेएम धुळे कॅम्पसचे‎ मार्गदर्शक संजय अग्रवाल, संतोष‎ अग्रवाल, अजय अग्रवाल, प्राचार्य‎ डॉ. समीर गोयल, प्राचार्य डॉ.‎ नीलेश साळुंके, प्राचार्या सुनंदा‎ मेनन, सीए कुणाल पसारी आदी‎ उपस्थित होते. प्राचार्य डॉ. नीलेश‎ साळुंके यांनी महाविद्यालयाची‎ शैक्षणिक प्रगती, राष्ट्रीय व‎ राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी प्राप्त‎ केलेले यश, महाविद्यालयात‎ राबवण्यात येणारे विविध उपक्रम‎ यांची माहिती दिली. स्नेहसंमेलनात‎ विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, फॅशन शो,‎ फॅन्सी ड्रेस आदी कार्यक्रम सादर‎ केले.

वार्षिक स्नेहसंमेलन तीन‎ दिवस चालले. त्यात पहिल्या दिवशी‎ पारंपरिक दिवस व स्वरांजली हा‎ गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात‎ आला. दुसऱ्या दिवशी डान्स पे‎ चान्स नृत्य कार्यक्रम व‎ विद्यालयातील शैक्षणिक तसेच‎ क्रीडा क्षेत्रात विद्यापीठ, राज्य‎ स्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या‎ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात‎ आला. तिसऱ्या दिवशी वार्षिक‎ स्नेहसंमेलन झाले. डॉ. नम्र जोशी,‎ प्रतीक्षा लोहार, महेक सय्यद,‎ गुणवंत पाटील, श्वेता बाविस्कर‎ आदींनी सूत्रसंचालन केले. प्रेरणा‎ इखार यांनी आभार मानले.‎ ‎कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य‎ डॉ. नीलेश साळुंके, अनमोल‎ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.‎ नम्र जोशी, प्रेरणा इखार, मयूरी‎ कुलकर्णी, अतुल पटवारी यांनी‎ प्रयत्न केले.‎

बातम्या आणखी आहेत...