आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सांस्कृतिक वैभव असलेल्या चित्रपटगृहांवर पडदा

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात शहरात मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहावयास मिळत होते. मोठा एेतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असलेल्या चित्रपटगृहांना मात्र या ना त्या कारणाने घरघर लागून हे चित्रपटगृह बंद होत गेली. शहरातील आठ पैकी फक्त दोन थिएटर सुरू आहेत. त्यात देखील वाढलेला खर्च व रसिकांचा अल्प प्रतिसादामुळे चित्रपटगृह चालवणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात कधीकाळी एक पडदा चित्रपटगृहांचा सुवर्णकाळ आता इतिहास जमा होण्याच्या वाटेवर आहे.

शहरातील नटराज, भतवाल, स्वस्तिक, प्रकाश, प्रभाकर, राजकमल ही चित्रपटगृहे बंद पडली. त्या पैकी काहींच्या इमारती आता खंडरमध्ये रूपांतरित झाले आहेत. चित्रपटगृहांच्या जागां विकसित करण्यासाठी असलेल्या जटिल नियमावलीमुळे चालना मिळत नाही.

आता फक्त ज्योती आणि मनोहर हे दोन चित्रपट गृहे सुरू आहेत. आताचे स्वस्तिक आणि पूर्वीचे विजयानंद चित्रपटगृहात व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत होते. त्यात पृथ्वीराज कपूर यांचे नाटकांचे प्रयोग झाले आहेत. आता हे चित्रपटगृह बंद झाले आहे.मोठी सांस्कृतिक चळवळ चित्रपटगृह बंद पडल्याने लयास गेली आहे.

सांस्कृतिक वैभव लयास
धुळे शहरात चित्रपटगृहांना मोठा वैभव होते.एकाच वेळेस तीन ठिकाणी चित्रपट लागल्या नंतर ते हाऊसफुल्ल होत होते.त्या माध्यमातून सामाजिक समरसता देखील प्रस्थापित होत होती. बॉबी चित्रपट तीन-तीन थिएटर हाऊस फुल्ल राहिला हाेता.

गरिबांना परवडणाऱ्या दरात हे चित्रपटगृह सुरू होते. मात्र हे चित्रपटगृह बंद पडणे हे सांस्कृतिक वैभव लयास जाण्या सारखे आहे.आज मोबाइल,टीव्हीवर चित्रपट पाहता येत असला तरी मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पहाण्याचा आनंद वेगळाच असतो.-जगदीश देवपूरकर,ज्येष्ठ कवी

चित्रपट गृह चालवणे कठीण
शासनाने चित्रपट गृहांचा टॅक्स कमी केला असला तरी, इतर खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. तर प्रेक्षकांचा प्रतिसाद अत्यल्प राहिला आहे. यामुळे चित्रपट गृह चालवणे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. विजेचे वाढलेले दर, देखभाल दुरुस्ती खर्च, मनुष्यबळाचा खर्च आवाक्याबाहेर आहे.

आता टीव्हीवर, इंटरनेटवर चित्रपट उपलब्ध होत असल्यामुळे चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झालेली आहे. यामुळे चित्रपट हाऊसफुल्ल होण्याचे प्रमाणदेखील कमी आहे.-दिनेश माळी, चित्रपटगृह मालक

बातम्या आणखी आहेत...