आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यम:दैनिक दिव्य मराठीने एक जबाबदार प्रसार माध्यम; दिव्य मराठी तर्फे रविवारी देवपुरात होणार रुबरू

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख समस्या व मुद्द्यांबाबत धुळेकरांचा आवाज म्हणून दैनिक दिव्य मराठीने एक जबाबदार प्रसार माध्यम म्हणून नेहमीच प्रभावीपणे विषय मांडलेले आहेत. हेच सामाजिक भान जपत पुन्हा एकदा शहरातील याच प्रमुख मुद्द्यांबाबत शहरातील सर्वसामान्य जनतेचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने १९ जूनपासून दर रविवारी ‘रूबरू... गोष्ट तुमची अन‌् तुमच्या वॉर्डाची’ या विशेष उपक्रमाचे आयाेजन केले आहे. यात दर रविवारी दिव्य मराठीची टीम तुमच्या प्रभागात/ वॉर्डात येऊन परिसरातील समस्या तुमच्याकडून जाणून घेणार आहे.

इतकेच नव्हे तर महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासमोर समस्या मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा करणार आहे. पहिला ‘रूबरू’ कार्यक्रम १९ जून रोजी सकाळी १० वाजता शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एकवीरा देवी विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या वेळी प्रभाग क्रमांक एक व दोनमधील नागरिकांना त्यांच्या प्रभागात नेहमी भेडसावणाऱ्या समस्या मांडता येणार आहेत.

या कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, अभियंता कैलास शिंदे, नगरसवेक रंगनाथ ठाकरे, नगरसेविका वंदना भामरे, विमलबाई पाटील, नगरसेवक नंदू सोनार, नगरसेविका भारती माळी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपल्या प्रभागातील समस्या मांडाव्यात, ‘दिव्य मराठी’तून त्या प्रकाशित केल्या जातील.

बातम्या आणखी आहेत...