आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेस हाताबुक्क्यांनी मारहाण:डाकीण संशयाने महिलेस मारहाण; 5 जणांवर गुन्हा

धडगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डाकीण बनून जीवे मारल्याच्या संशयावरुन तालुक्यातील सिरसानी हनवारीपाडा येथील महिलेस हाताबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिरसानी हनवारीपाडा (ता.धडगाव) येथील सपना सुभाष पाडवी (३१) हिने डाकीण बनून जादुटोणा करुन वेरंग्या कागडा पाडवी यास खावून जीवे मारले, असा संशय घेवून कागडा माद्या पाडवी, उदेसिंग वेरंग्या पाडवी, निर्मल वेरंग्या पाडवी, विरसिंग कागडा पाडवी यांनी तिला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच गावातून निघून जावे यासाठी तिला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. सदर घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती.

त्यानंतर पुन्हा २५ ऑगस्टला संशयित महिलेला मारहाण करण्यात आली. या कारणाने सपना सुभाष पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कागडा माद्या पाडवी, उदेसिंग वेरंग्या पाडवी, निर्मल वेरंग्या पाडवी, विरसिंग कागडा पाडवी, रेमतीबाई वेरंग्या पाडवी सर्व (रा.हनवारीपडा ता.धडगाव) यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ महाराष्ट्र जादूटोणा अधि क ३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकूळ औताडे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...