आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलूप:डांगुर्णे आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीला वर्षापासून कुलूप

सोनगीर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधून एक वर्ष झाले. त्यानंतर या इमारतीचे लोकार्पणही झाले. पण एक वर्षापासून इमारतीला कुलूप आहे. अद्याप या इमारतीतून आरोग्य सुविधा मिळण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे परिसरातील रुग्णांना उपचारासाठी सोनगीर किंवा चिमठाणे येथे जावे लागते. त्यातून रुग्णांची गैरसोय होत असल्याने याविषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

डांगुर्णे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधण्यात आली. ही इमारत गावाजवळील चिमठावळ रस्त्यावर असून, हे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केले. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी मुख्य इमारत, निवास्थान आहे. हे काम ३० ऑगस्टला २०२१ मध्ये पूर्ण झाले. त्यावर सुमारे ६५ लाख रुपये खर्च झाले. माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते नव्या इमारतीचे लोकार्पण झाले. लोकार्पणानंतर नव्या इमारतीकडे डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. आरोग्य विभागाने उपकेंद्र सुरू करून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी कैलास मोरे, अभिमन मोरे, बन्सीलाल मोरे आदींनी केली.

अपेक्षा ठरली फोल
गावात आरोग्य केंद्रासाठी इमारत हाेत असल्याने चांगल्या सुविधा मिळतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा फोल ठरली आहे. नवीन इमारतीकडे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी फिरकलेही नाही. काही दिवसांपासून गावात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या इमारतीत ओपीडी, लसीकरण सुविधा, प्रसूतिगृह सुरू करावे.सुवर्णा कैलास मोरे, सरपंच

बातम्या आणखी आहेत...