आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासह नव्या वसाहतींमधील बहुसंख्य रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक व वाहनधारकांना अताेनात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेवटी बहुसंख्य रस्त्यांची कामे करण्यात आली. काही रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले. दरम्यान काही रस्त्यांची कामे मंजूर होती. नंतर मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकाची नियुक्ती झाली. गेल्या ७ महिन्यांपासून प्रशासकाच्या हातात कारभार आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे अपूर्ण राहिली. पावसाळा सुरू झाल्याने हेच रस्ते आता त्रासदायक ठरत आहेत. रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे माेठमाेठे डबके साचले आहेत. पाडळद्याकडे जाणाऱ्या चार रस्त्यालगतच्या रस्त्याची अवस्था फारच खराब आहे. पाडळदा चौफुली ते बॉम्बे मार्केटपर्यंत मोटारसायकल चालवणेही कठीण झालेे. मोठ्या आकाराचे खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
शहरात सर्वात जास्त खराब रस्ते नवीन वसाहतींमध्ये आहे. पावसाळ्यात सर्व रस्ते चिखलात आहेत.काळी माती व चिखल त्यात पाण्यचे डबके अशी परिस्थिती असल्याने तेथील रहिवासी आपले वाहन घरापर्यंत येऊ शकत नाही.चिखला मध्ये आपली वाहने अडकून पडतात.लहान शाळकरी विद्यार्थी चिखलात पडतात. सरस्वती कॉलनी, मीरा नगर, संभाजी नगर, बालाजी नगर, दादाश्री नगर, तुळसी नगर, पतंजली नगर भागातील रस्ते खराब झाले आहेत. तर प्रेस मारुती परिसरात गेल्या पाच वर्षांत एकाही रस्त्याचे काम झालेले नाही. संबंधित नगरसेवकांनी पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.