आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:मित्राच्या विवाहासाठी आलेल्या युवकाचा मृत्यू

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळ असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव वेगातील वाहनाने बुलेटला धडक दिली. या अपघातात नाशिक येथील बुलेटस्वार तरुण ठार झाला. किरण जाधव असे त्याचे नाव आहे. ताे नंदुरबारला विवाहाला गेला होता. नाशिककडे परत जात असताना रविवारी अभय महाविद्यालयाजवळ त्याचा अपघात झाला.नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सैनिक वसाहत आहे. या ठिकाणी राहणारा किरण हा माजी सैनिकाचा मुलगा आहे.

मित्रांच्या लग्नासाठी तो बुलेटने (एमएच-२६-डीडी-६५५४) नंदुरबारला आला होता. विवाह झाल्यावर तो रविवारी धुळे मार्गे नाशिककडे जात होता. त्या वेळी अज्ञात भरधाव वेगातील वाहनाने त्याच्या बुलेटला धडक दिली. त्यानंतर अज्ञात चालक पसार झाला. अपघातात किरण गंभीर जखमी झाला. काही नागरिकांच्या मदतीने त्याला हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. काही वेळाने मागून किरणचे मित्र आल्यावर त्याची ओळख पटली. तसेच त्याच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पाेलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...