आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:संतती नियमन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू‎

धुळे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुसुंबा येथील शासकीय‎ रुग्णालयात संतती नियमनची‎ शस्त्रक्रिया केल्यानंतर काही वेळाने‎ महिलेचा मृत्यू झाला. कविता मोरे‎ असे मृत महिलेचे नाव आहे.‎ कुसुंबा येथील माहेर असलेल्या‎ कविताचा विवाह मालेगाव‎ तालुक्यातील विकास मोरे यांच्या‎ सोबत झाला होता. दोन महिन्यांपूर्वी‎ त्या प्रसूत झाल्या होत्या. संतती‎ नियमन शस्त्रक्रियेसाठी त्यांना २‎ मार्चला कुसुंबा येथील रुग्णालयात‎ आणले होते.

या ठिकाणी‎ शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना त्रास‎ जाणवू लागला. प्रकृती‎ बिघडल्यामुळे त्यांना हिरे‎ रुग्णालयात हलवण्याचा डॉक्टरांनी‎ सल्ला दिला. त्यानुसार मोरे यांना‎ हिरे रुग्णालयात दाखल केले. पण‎ उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. धुळे‎ तालुका पोलिसांत नोंद झाली.‎

बातम्या आणखी आहेत...