आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या‎:कर्जबाजारी शेतकऱ्याची‎ मेहेरगावला आत्महत्या‎

धुळे‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जबाजारीपणाला कंटाळून‎ शेतकऱ्याने आत्महत्या केली. धुळे‎ तालुक्यातील मेहेरगाव येथे ही घटना‎ घडली. भटू भामरे असे मृत‎ शेतकऱ्याचे नाव आहे.‎ मेहेरगाव येथील भटू हिलाल‎ भामरे (वय ५५) यांनी शेतीसाठी‎ कर्ज घेतले होते.

पण त्यांना अपेक्षित‎ उत्पन्न मिळाले नाही. कर्जाचे हप्ते‎ वेळेवर भरले जात नसल्याने ते‎ व्यथित होते. याच चिंतेतून त्यांनी‎ शेतात गळफास घेतला. त्यांचे भाऊ‎ सुरेश हिलाल भामरे शेतात‎ आल्यावर हा प्रकार उघडीस आला.‎ उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू‎ झाला होता. या प्रकरणी सुरेश भामरे‎ यांच्या माहितीवरून साेनगीर पोलिस‎ ठाण्यात नोंद झाली.‎

बातम्या आणखी आहेत...