आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:खडाजंगीनंतर पपईला प्रति किलो 10 रुपये 25 पैसे भाव देण्याचा निर्णय; आजपासून होणार लागू

शहादा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे बाजार समिती कार्यालयात फळबागायतदार शेतकरी व व्यापारी यांच्यात शुक्रवारी बैठक होऊन चर्चेअंती पपईला प्रति किलो १० रुपये २५ पैसे प्रमाणे भाव ठरवला. हा भाव दिनांक १७ डिसेंबरपासून लागू होणार आहे.बैठकीला फळ बागायतदार शेतकरी संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव हेमंत चौधरी, मुख्य उपस्थित शेतकऱ्यांमध्ये जयनगर येथील भगवान पाटील, वरुळ कानडीचे अशोक मंगा पाटील, कुढावदचे अशोक पाटील, शहादा येथील खंडू पाटील, वडछीलचे विठ्ठल पाटील, कुकडेलचे अनिल पाटील, पुनाजी पाटील, पिंपळाेदचे अंबालाल पाटील, मोहिदाचे जयप्रकाश पाटील, व्यापाऱ्यांमध्ये सरताज हाजी, नाजीम हाजी, मुल्लाजी हाजी, फारुख हाजी आदींसह व्यापारी उपस्थित होते.

दीड तास चालली बैठक बैठक सुमारे दीड तास चालली. बैठकीत पपईला दिला जाणारा भावावरून शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये बरीच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव देऊन व्यापारी अन्याय करत असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत होते. व्यापारी मात्र भाव वाढीस विरोध दर्शवत होते. शेतकरी निर्णयावर ठाम होते. अभिजीत पाटील व सभापती सुनील पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेतली.

शहादा तालुक्यातून रोज २०० गाड्या पपई निर्यात शहादा तालुक्यात साधारणता ५ हजार हेक्टर क्षेत्र पपई लागवड केली आहे. रोज जिल्ह्यातून २०० गाड्या पपईच्या भरून जातात. त्यात शहादा तालुक्यातून रोज ५० गाड्या भरून पपई जाते. सर्वाधिक पपईमध्ये प्रदेशात व त्या खालोखाल गुजरात राज्यातील व्यापारी नेत असल्याची माहिती शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांनी दिली.

आता बैठकीतच होणार भावाचा निर्णय आता व्यापारी परस्पर कागदावर भाव ठरवणार नाहीत. बैठकीतच निर्णय घेण्यात येईल. शेतकरी काबाडकष्ट करतो. व्यापारांनी पोलिस स्टेशनला व्हेरिफिकेशन ओळखपत्रासाठी कागदपत्र देण्याची संमती व्यापाऱ्यांनी दिली. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये संबंध चांगले राहतील, असे अभिजीत पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...