आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिरपूर साखर कारखान्याचा निर्णय बहुराज्यीय कायद्यानुसार नवी दिल्लीतील केंद्रीय निबंधकांच्या माध्यमातूनच होईल, असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अप्पर मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १३ जूनला राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांना (सहकार) लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बहुराज्यीय साखर कारखाना आहे. कारखान्याचे कामकाज बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ नुसार चालत असून, कारखान्याचे निबंधक केंद्रीय निबंधक नवी दिल्ली आहे. कारखान्याचे कामकाज बहुराज्यीय कायद्यानुसार चालत असल्याने राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत कार्यवाही करता येणार नाही. सद्य:स्थितीत कारखाना बंद अवस्थेत असून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज रकमेपोटी कारखान्याची मालमत्ता सरफेसी कायद्यांंतर्गत ताब्यात घेतली आहे. शिरपूर साखर कारखान्यावर प्रशासक नेमणे किंवा कारखाना भाडेतत्त्वावर देणे ही बाब राज्य शासनाच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे यापूर्वीच कळवले असल्याचे आहे.
खोटे पत्रव्यवहार करून दिशाभूल करू नका
याविषयी जिल्हा परिषदेचे सदस्य देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, डॉ. जितेंद्र ठाकूर खोटेनाटे पत्रव्यवहार करून जनतेची दिशाभूल करत आहे. कारखाना अवसायनात आहे की सुरू आहे तसेच कारखाना बहुराज्यीय आहे की राज्य शासनाच्या नियंत्रणात आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही, असा आरोप देवेंद्र पाटील यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.