आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेमवारपासून नवरात्राेत्सवाला प्रारंभ होत असून शहरातील मंदिरांची सजावट पूर्ण झाली असून विद्युत राेषणाई देखील करण्यात आली आहे. दोंडाईचा रस्त्यावरील प्रेस मारुती मैदानावर भरणाऱ्या यात्रेची तयारीही पूर्ण झाली आहे. मैदानावर विविध पाळणाघरे, मनोरंजनाची साधने, दाखल झाली असून नवरात्राेत्सवानिमित् त १० दिवस यात्रा चालते. कोराेना महामारीनंतर अडीच वर्षांनी यात्रा भरत असल्याने मोठा उत्साह दिसत आहे.
यात्रेत विविध चीजवस्तूंची दुकाने थाटली असून त्यात महिला साैंदर्यप्रसाधने, खेळणी, खाद्यपदार्थ, रसवंती गृहे, संसाराेपयाेगी साहित्य आदींचा समावेश आहे. दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी माता मंदिराची पूर्ण सजावट केली आहे. अतिशय सुंदर व आकर्षक प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे.मंदिर आवारात भाविकांच्या सोयीसाठी भव्य मंडप उभारला असून मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. नवरात्रीत रोज पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. त्यांची काेणतीही गैरसाेय हाेऊ नये यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर दिला आहे.
प्रेस मारुती मैदानालगत असलेल्या भव्य तुळजाभवानी माता मंदिर परिसराचीही सजावट पूर्ण झाली असून मंडप उभारला आहे. दहा दिवस गरबा स्पर्धा घेतल्या जातात. याच परिसरात जुने प्रेस मारुती मंदिर असून ते भाविकांचे श्रद्धास्थान आहे. विजया दशमी दिनी नागरिक या ठिकाणी सीमोल्लंघनासाठी येतात. प्रेस मारुती ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास चौधरी यांनी स्वखर्चातून रोषणाई केली आहे. खेतीया रस्त्यावरील अंबाजी मंदिर परिसराचीही सजावट करण्यात आली असून नवरात्रीत शेवटच्या दिवशी मोठा यज्ञ, होम-हवन पूजा होते. महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेश जैन, विनय गांधी व मंदिर ट्रस्टचे सर्व सदस्य योगदान देतात. पाेलिस बंदाेबस्त तैनात असताे. दरम्यान नवरात्राेत्सव काळात विविध धार्मिक अनुष्ठान, हाेमहवन, सप्तशती पठण आदी विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले असून भाविकांना त्यात सहभाग, उपस्थिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म्हाळसादेवी मंदिरात ५० जाेडप्यांच्या हस्ते महापूजा
शहरातील भावसार मढीतील हिंगलाज माता मंदिराची सजावट पूर्ण झाली आहे. शहरापलीकडे असलेल्या तिखोरा येथे सर्वात पुरातन अशा पद्मावती माता मंदिराची देखील सजावट करण्यात आली. मंदिर आवारात मंडप उभारला असून दर्शनासाठी माेठी गर्दी उसळते. डोंगरगाव रस्त्यावरील म्हाळसादेवी मंदिरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई केली. शेवटच्या दिवशी ५० पेक्षा अधिक जोडप्यांना महापूजेसाठी आमंत्रित केले जाते. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.गणेश सोनवणे, डॉ.कलाल व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.