आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार व धुळे जिल्ह्यातील तापी काठावरील बंद पडलेल्या २२ उपसा जलसिंचन योजना सुरू करण्याच्या वाढीव प्रस्तावास महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती मागे घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दोंडाईचा येथे आले असता दीपक पाटील यांनी त्यांना व माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी बंद पडलेल्या २२ उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यासाठी ३ मे २०१६ ला ४१ कोटी ७८ लाख रुपयाच्या निधी दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. दीपक पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला. १३.४१३ हेक्टर लाभक्षेत्र ५९ गावातील १० हजार शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध होईल. उपसा सिंचन योजना सुरु करण्याबाबत तापी खोरे विकास महामंडळ जळगाव यांची शिफारस देखील शासनाकडे ११५.४ कोटी रुपयाची वाढीव प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. २१ जानेवारी २०२२ ला शासनाने प्रस्तावास मान्यता दिली होती. नंतर मात्र या वाढीव प्रस्तावास महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभागाने स्थगिती दिली. ९० टक्के काम झालेले आहे, असे असतांना स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हितासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ उपसा जलसिंचन योजनेच्या वाढीव प्रस्तावास मान्यता देऊन धमाने तालुका शिंदखेडा येथे व प्रकाशा तालुका शहादा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देवेंद्र फडणीस यांनी शेतकरी मेळावे घेण्यात यावे, असे देखील निवेदनात म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.