आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:धनगर समाजाबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनगर-हटकर समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान व आमदार गोपीचंद पडळकर यांना शिवीगाळ करणारे एपीआय शिवाजी नागवे यांची राज्य सरकारने ताबडतोब हकालपट्टी करावी. तसेच सेवेतून बडतर्फ केले नाही, तर विधानसभेचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी दिला आहे. एपीआय नागवे यांच्या विरोधात धनगर समाजातर्फे शहरात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धनगर समाजाचे नेते सुनील वाघ म्हणाले की, जालना जिल्ह्यात धनगर समाजातील काही नागरिक तक्रार करण्यासाठी एपीआय शिवाजी नागवे यांच्याकडे गेले होते. त्या वेळी त्यांनी चुकीची वागणूक दिली.

बातम्या आणखी आहेत...