आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला व बालकल्याण विभागातर्फे बालक आणि महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पोषण ट्रकरवर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. त्यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान विशेष मोहिम राबवण्यात आली. त्यानूसार आत्तापर्यंत एक लाख लाभार्थ्यांची नोंद पोषण ट्रॅकरवर झाली आहे. अद्याप तेवढ्याच लाभार्थ्यांची आधार नोंदणी होणे बाकी आहे. आधार नोंदणीचे काम वेळेत व्हावे यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाने महसुल प्रशासनाकडे आधार मशीनची मागणी केली आहे.
महिला आणि बालकल्याण विभागातर्फे ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार दिला जातो. तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण होते. याशिवाय गरोदर माता, स्तनदा मातांची तपासणी केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची पोषण ट्रकरवर नोंदणी केली जाते आहे. त्यानूसार लाभार्थ्यांचा आधार क्रमांक पोषण ट्रकरवर अपलोड केला जातो आहे. बहुतांश लाभार्थ्यांचे आधार कार्ड नसल्याने ते काढण्यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात आली. आधार कार्ड काढण्यासाठी महसूल प्रशासनाने ४४ मशिन दिले हाेते. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या १९ मशिनचाही वापर करण्यात आला. त्यानूसार आत्तापर्यंत एक लाख लाभार्थ्यांची आधार नोंदणी पोषण ट्रक्टरवर झाली आहे. दरम्यान, १५ जुलै नंतर महसूल यंत्रणेकडून प्राप्त आधार मशिन परत करावे लागले आहे. त्यामुळे आता महिला आणि बालकल्याण विभागाच्या स्वमालकीच्या १९ मशिनच्या आधारे लाभार्थी महिला आणि बालकांची आधार नोंदणीची प्रक्रिया सुरु आहे.
हे काम निर्धारीत वेळेत पूर्ण व्हावे असे आहेत आतापर्यंतचे नोंदणी झालेले लाभार्थी
जिल्ह्यात ३ ते ६ वर्ष वयोगटातील ४४ हजार ८७८, ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील३० हजार ८८७, ० ते ६ महिने वयोगटातील तीन हजार ७५२, ८ हजार १६७ गरोदर महिला, ६ हजार २७७ स्तनदा मातांची नोंदणी पोषण ट्रॅकरवर झाली आहे. आधार नोंदणीसाठी डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. सन २०२३ मध्ये ज्यांची पोषण ट्रकरवर आधार नोंदणी नसेल त्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येणार नाही.यासाठी अतिरिक्त आधार नोंदणी मशीनची मागणी महिला बालकल्याण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पोषण ट्रॅकरवर माहिती नोंदवण्यात आल्याने योजनेत होणारे गैरप्रकार कमी होण्यास मदत होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.