आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र:आदिवासी महासंघाच्या झालेल्या बैठकीत मागणी; आदिवासी समाजासाठी स्वतंत्र धर्मकोड टाका

शहादा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी एकता परिषद शहादा व नंदुरबार यांच्या वतीने शहादा येथे संभाजीनगर येथील बोधिवृक्ष परिसरात आदिवासी समाजासाठी स्वतंत्र धर्मकोड कॉलम टाकण्यात यावा, या हक्काच्या मागणीसाठी आदिवासी समाजात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जन महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आदिवासी महासंघाचे डॉक्टर भरत वळवी होते.

आदिवासी धर्मकोड कॉलम टाकण्यात यावे, या मागणीकरिता देशव्यापी आंदोलन सुरू असून, याबाबत राजस्थान येथील जयपूर येथे देशव्यापी विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आदिवासींचा स्वतंत्र धर्मकोड कॉलमकरिता भरवण्यात आलेल्या संमेलनात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा ठराव भारतातील आदिवासी संघटनेमध्ये काम करणाऱ्या २६ राज्याच्या प्रतिनिधींनी पास केला असल्याची माहिती आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक सदस्य वाहरू सोनवणे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड कॉलम हवे याकरिता आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही या बैठकीत देण्यात आली. जन महापंचायतीचे वाहरू सोनवणे, झेलसिंग पावरा, नामदेव पटले, सुरेश मोरे, प्रा.अशोक वळवी, सुभाष नाईक, गुड्ड ठाकरे, जमन ठाकरे, मंगेश बर्डे, चंद्रसिंग बर्डे, सतीश पवार, सुशील कुमार पावरा, प्रभुजी नाईक, जगन ठाकरे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

चिंतन बैठकीत सर्व संघटनांचा एक सूर
आदिवासींची स्वतंत्र ओळख टिकवण्यासाठी, देशाच्या लोकसंख्येची जनगणना होत असताना आदिवासींचा स्वतंत्र ओळख धर्मकोडसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच उपस्थित प्रतिनिधींनी भरवलेल्या महापंचायतीत ठराव पास केला. आगामी काळात आदिवासी स्वतंत्र धर्म कोड कॉल करिता सर्वच आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन राज्यव्यापी आंदोलन करण्याकरिता सज्ज राहण्याचे आवाहन केले.

समाजातील रूढींवर चर्चा
आदिवासींच्या मुलींची विक्री थांबवणे, आदिवासी समाजात इतर धर्म, पंथाच्या घुसखोरीला आळा घालणे, लग्न विधीत ब्राह्मणाला न बोलावता समाजाच्या जाती रिवाजाप्रमाणे लग्न लावणे तसेच बँड बंद करण्यात येऊन ढोल, झांज, थाळी आदी पारंपरिक वाद्याच्या वापर करणे, जुनी लग्नपद्धत लोकगीते, वाद्य अमलात आणणे, गाव पातळीवरील पंच कमिटी सक्षम करणे या विषयांवर चर्चा करून अंमलबजावणीकडे वाटचाल करावी असे ठरले.

बातम्या आणखी आहेत...