आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील लोहारा शिवारातील सर्वे नंबर ५६ ला लागून असलेल्या नाल्यावरील साठवण बंधाऱ्याच्या बांध जे.सी.बी. यंत्र लावून अज्ञात इसमाने तोडून टाकल्याने शासनाचे शिवाय परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केेले आहे, अशी तक्रार शेतकरी नवीन टिला चौधरी यांनी केली आहे.
गेल्या वीस वर्षापासून सर्वे नंबर ५६ ला लागून नाल्यावर तीन सिमेंट व दगडाचे बांध बांधण्यात आलेले आहेत. पावसाळ्यात यांना मोठे पूर येतात. या पुराचे पाणी वाया जाऊ नये म्हणून जिल्हा परिषद लघुसिंचन मार्फत तीन बांध भरलेले आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जाते. या बंधाऱ्यामुळे परिसरात जमिनीत पाण्याचे पातळीत वाढ होण्यास मदत होते. शेतकऱ्यांना हे बंधारे लाभदायक ठरले आहेत.
\गेल्या दोन वर्षापूर्वी नाला खोलीकरण योजनेच्या माध्यमातून बांध मधील गाळ काढण्यात आलेला होता. नाला पूर्णपणे खोल करण्यात आला. मात्र कुणीतरी अज्ञात इसमाने सिमेंट व दगडाने बांधलेला अर्धा बांध जेसीबी यंत्र लावून तोडून टाकलेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी वळविले जाणार नाही ते वाया जाईल. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शहादा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी तात्काळ भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी व तात्काळ तोडून टाकण्यात आलेल्या बांधाचे बांधकाम करावे. अन्यथा नाईलाजाने उपोषण करावे लागेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी नवीन तिला चौधरी यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.