आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीशाळा व गाव बैठक:शंभर हेक्टरवर कापूस पिकाचे प्रात्यक्षिक; योजनांवर प्रबोधन

तऱ्हाडी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागातर्फे शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी, भटाणे येथील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेंतर्गत तऱ्हाडी, ममाणे, भटाणे शिवारात कापूस पीक प्रात्यक्षिक १०० हेक्टर क्षेत्रावर राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची शेतीशाळा व गाव बैठक घेण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या.

परिसरातील नरेश भाईदास सोनवणे यांच्या कापूस प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. प्रत्यक्ष कृतीतून पिकावरील नुकसानकारक शत्रूकीड ओळख आणि मित्र किडींची ओळख करणे, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कामगंध सापळे, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, रस शोषणारे किडी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशीचे नियंत्रण, गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन, मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन, मृद आरोग्य पत्रिका किंवा जमीन सुपीकता निर्देशांक, पीक शिफारसीनुसार एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणीद्वारे खते देणे, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करणे आदी विषयांवर कृषी सहायक महेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देण्यात आली. शेतीपूरक व्यवसायबाबत कृषी सहायक महेंद्र पाटील यांनी माहिती दिली. पीक विमा योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, गांडूळ युनिट, फळबाग लागवड योजना, महाडीबीटी पोर्टल, कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी सुधीर ईशी, कृषी पर्यवेक्षक एन. एन. महाजन आणि ललित पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...