आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:अत्याचाराच्या विरोधात केली निदर्शने‎

धुळे‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात दलितांवर अत्याचार वाढले‎ आहे. या घटनेचा निषेध‎ करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट‎ पक्षातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी‎ कार्यालयासमाेर निदर्शने झाली.‎ याविषयी जिल्हा प्रशासनाला‎ निवेदन देण्यात आले.‎ गुजरातमध्ये दलित तरुणाला‎ गाेरक्षकांनी मारहाण केली. उत्तर‎ प्रदेशातील हाथरस येथेही अशीच‎ घटना घडली. तसेच समाजातील‎ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर‎ मिळत नाही. अर्थसंकल्पात अनेक‎ याेजनांना कात्री लावली आहे.‎ मागासवर्गीयांना सर्व सुविधांपासून‎ वंचित ठेवले जाते आहे. केंद्र‎ सरकार आरक्षण संपवते आहे.‎

दलित समाजावर होणारे अत्याचार‎ थांबवण्यासाठी अॅट्राॅसिटी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कायद्याची कठोर अंमलबजावणी‎ करावी, कंत्राटीकरण रद्द करून‎ सफाई कामगारांना कायम करावे,‎ असंघटित कामगारांना किमान वेतन‎ व अन्य कायदेशीर सुविधा द्याव्या,‎ किमान वेतन न देणाऱ्यांवर कारवाई‎ करावी, खासगीकरण केलेल्या‎ क्षेत्रात अनुसूचित जाती, जमाती‎ वर्गाला आरक्षण द्यावे,‎ झाेपडपट्टीधारकांचे त्याच जागेवर‎ पुनर्वसन करावे, स्थलांतर कायदा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रद्द करावा आदी मागण्यांसाठी‎ आंदोलन झाले. आंदोलनात‎ हिरालाल परदेशी, वसंत पाटील,‎ हिरालाल सापे, पाेपट चाैधरी, नाना‎ अहिरे, अॅड.मदन परदेशी, हिरालाल‎ वाणी,शंकर पाटील, हरिचंद्र लाेंढे,‎ मनाेहर पाटील,मनाेहर निंबाळकर,‎ अरविंद पाटील, किशाेर सूर्यवंशी,‎ रामचंद पावरा, सतिलाल पावरा,‎ अॅड.संताेष पाटील, अशाेक पाटील,‎ अर्जुन काेळी आदी सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...