आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणे‎ आंदोलन:हक्काच्या पैशांसाठी ठेवीदार आक्रमक‎

शिंदखेडा‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भोईराज ग्रामीण बिगरशेती‎ सहकारी पतसंस्थेत गैरप्रकार झाला‎ आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई‎ करावी, ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे‎ पैसे द्यावे, या मागणीसाठी भील‎ समाज विकास मंचचे संस्थापक‎ अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या‎ नेतृत्वाखाली ठेवीदार व खातेदारांनी‎ तहसील कार्यालयासमोर धरणे‎ आंदोलन सुरू केले. प्रशासनाच्या‎ आश्वासनानंतर सायंकाळी‎ आंदोलन मागे घेण्यात आले.‎

शहरातील भोईराज ग्रामीण‎ बिगरशेती सहकारी पतसंस्थेत‎ गैरप्रकार झाला आहे. या प्रकरणी‎ मॅनेजर व संचालकाला अटक झाली‎ होती. त्यानंतर त्यांची जामिनावर‎ सुटका झाली. दुसरीकडे‎ पतसंस्थेच्या ठेवीदारांना पैसे‎ मिळणार नाही, असा दावा दोघे‎ करत आहे. याविषयी ठेवीदारांनी‎ तहसीलदार तसेच सहायक‎ निबंधक संजय गिते व प्रशासकांना‎ निवेदन दिले होते. त्या वेळी‎ सहायक निबंधक संजय गिते यांनी‎ आठ दिवसांत कारवाई करण्याचे‎ आश्वासन दिले होते. पण कारवाई‎ झाली नाही. त्यामुळे सोमवारपासून‎ आंदोलन सुरू करण्यात आले.‎

आंदोलनात भील समाज विकास‎ मंचचे अध्यक्ष दीपक अहिरे, सुनील‎ सोनवणे, श्रावण मराठे, चंद्रकांत‎ सोनवणे, बानूबाई भील, हिराबाई‎ परदेशी, शोभा कनोजिया, पानाबाई‎ भील, महेंद्र परदेशी, प्रकाश देवरे,‎ रोहित परदेशी, प्रवीण मोरे, किशोर‎ चौधरी, देविदास शिंपी आदी‎ सहभागी झाले हाेते. आंदोलकांशी‎ सायंकाळी प्रशासनाने चर्चा केली.‎ त्यानंतर आंदोलन स्थगित झाले.‎

बातम्या आणखी आहेत...