आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटकंती थांबेना:उपमहापौरांचाच प्रभाग तहानलेला, पाण्यासाठी आयुक्तांकडे हंडा मोर्चा; आठ दिवसांनंतर येणाऱ्या पाण्यामुळे महिला हैराण

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपूरातील भगवती नगरात आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या प्रभागातील महिलांनी मंगळवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला. आयुक्त देवीदास टेकाळे यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. भगवती नगर उपमहापौर अनिल नागमोते यांच्या प्रभागात येते. भगवती नगरातही वेळेत पाणीपुरवठा होत नाही. या भागात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी महिला थेट हंडे घेऊन महापालिकेत आल्या. त्यांनी आयुक्त टेकाळे यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत वेळेवर पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली. भगवती नगरातील मोकळ्या जागेत हनुमान व महादेव मंदीर आहे. या भागात गटारी नसल्याने मंदीराच्या परिसरात सांडपाणी वाहून येते. त्यामुळे याविषयाकडे लक्ष द्यावे.प्रभागातील प्रश्नांसाठी प्रभागात नियमित पाणीपुरवठा करावा, रस्ता व गटारीचे काम करावे, अशी मागणी मिना भामरे, रंजना गिरासे, संगीता पाटील, अलका पाटील, सूवर्णा पाठक, मीना ठाकरे, भाग्यश्री ठाकरे, वंदना सोनवणे, छाया पाटील, मंगल पाटील आदींनी केली.

शिवसेनेचे आज आंदोलन : पाणीप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनतर्फे उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेत आंदोलन होईल. शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरीकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळते. पण मनपा प्रशासन, सत्ताधारी उपाययोजना करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती कार्यालयाजवळ जमावे असे आवाहन संजय वाल्हे यांनी केले आहे.

पाच दिवसांचे नियोजन नाही
महापालिका प्रशासनाने काही दिवसापूर्वी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न होतील असे स्पष्ट केले होते. पण अद्यापही नियोजन करण्यात आलेले नाही. अनेक भागात आठ ते नऊ दिवसानंतर पाणीपुरवठा होतो आहे. जलस्त्रोतांमध्ये मुबकल प्रमाणात पाणी असतांनाही केवळ नियोजन नसल्याने स्थिती निर्माण झाली आहे.

सर्वच भागात विस्कळीत, नियोजन केले सुरू
काही वेळा तांत्रिक अडचणी येतात. जलवाहिनीच्या गळत्या थांबवण्यात आल्या आहे. सर्व जलकुंभ वेळेत भरण्याचे नियोजन होते आहे. सर्वच भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. किमान पाच ते सहा दिवसानंतर पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न आहे. प्रशासनासोबत बैठक घेऊ.
अनिल नागमोते, उपमहापौर, मनपा

बातम्या आणखी आहेत...