आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:तेढ टाळून सांघिकतेतून सर्वांगीण विकास साधा ; अनुसूचित जाती आयाेगांच्या अध्यक्षाचा सल्ला

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही जणांमध्ये झालेल्या वादामुळे दाेन समाजात तेढ निर्माण हाेऊ देऊ नका. सर्वांनी एकत्र आणि एकाेप्याने राहून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सांघिकपणे काम करावे असे आवाहन अनुसूचित जाती जमाती आयाेगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले. त्यांनी शुक्रवारी मेहेरगाव येथे भेट देत ग्रामस्थांबराेबर संवाद साधला.

या वेळी आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे, के. आर. मेढे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शर्मा, पोलिस अधीक्षक पाटील यांनी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. अभ्यंकर यांनी मेहेरगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. बैठक घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी मैराळे, अप्पर तहसीलदार संजय‍ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, सरपंच महेंद्र भामरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...