आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील आर.सी. पटेल ट्रस्ट संचलित आयएमआरडी परिसंस्थेत वेगवेगळ्या तीनस्तरावर विद्यापीठस्तरीय बेस्ट बिझनेस आयडिया स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, उद्योग-व्यवसायाबद्दल लागणारे कौशल्य विकसित करण्यासाठी ही स्पर्धा झाली. स्पर्धेत विविध महाविद्यालयाच्या ५८ संघांतून १३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेत प्रत्येक फेरी बादफेरी होती. प्रथम फेरीमध्ये विविध महाविद्यालयामधून ५८ संघांमधील १३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या फेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी बिझनेस आयडिया ५०० शब्दांमध्ये नोंदवली. नावीन्यपूर्णता आणि क्षमता या निकषांद्वारे विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या फेरीत ३६ संघातील विद्यार्थ्यांनी बिझनेस आयडिया मांडल्या. त्यानंतर अंतिम फेरीसाठी १० संघांची निवड करण्यात आली. द्वितीय बाद फेरीचे मूल्यमापन प्रा. येागेश शेठिया, प्रा. प्रियंका भंडारी, प्रा.कौस्तुभ सावंत, प्रा.अमित पाटील यांनी केले. अंतिम फेरीमध्ये स्पर्धकांना १५ मिनिटे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनसाठी तर ५ मिनिटे प्रश्नोत्तरासाठी देण्यात आले. अंतिम फेरीचे आयोजन आयएमआरडी परिसंस्थेत ऑफलाइन झाले. बाद फेरीमधून निवडलेल्या संघांचे मूल्यमापन प्रा.डॉ. ए.यू.टाटिया (आर. सी. पटेल कॉलेज ऑफ फार्मसी शिरपूर), प्रा. डॉ. डी.डी.भक्कड (एस.पी.डी.एम. कॉलेज शिरपूर), प्रा.डॉ.एस.ए.मोरे (आर.सी.पी.आय.टी. शिरपूर) यांनी केले. सर्व सहभागी संघ व स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. ए. यू. टाटिया, प्रा. डॉ. एस. ए. मोरे, प्रा. डॉ. डी. डी. भक्कड यांनी कौशल्यांची माहिती दिली. डॉ. वैशाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेत हे विद्यार्थी ठरले विजेते
अंतिम दहा संघांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे बिझनेस आयडिया सादर केल्या. त्यातून तीन संघांना रोख पारितोषिक देण्यात आले. त्यानुसार प्रथम पारितोषिक मुस्तफा मुर्तजा भारमलने, द्वितीय नूपुर पंकज पटेल, ब्रजेश तुलसीदास पटेल, हर्षल वसंत मंधान, निकिता विजय पटेल यांनी तर तृतीय पारितोषिक भार्गवी धर्मेंद्र चव्हाण व निशा उचल साहू यांना मिळाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.