आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:नरडाणा-पिंप्राड-अजंदे विकासोवर विकास पॅनलने राखले वर्चस्व; चेअरमनपदी भामरे यांची बिनविरोध निवड

सोनगीर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा तालुक्यातील महत्त्वाची मानली जाणारी नरडाणा- पिंप्राड- अजंदे विविध कार्यकारी सहकारी संस्थेची चेअरमन व व्हाइस चेअरमन पदाची निवडणूक मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी एस.डी. कोकणी यांच्या उपस्थितीत झाली.

चेअरमन पदासाठी भाऊसाहेब बाबूराव धनगर व व्हाइस चेअरमन पदासाठी अजंदे येथील रमेश श्यामकांत भामरे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक माधुरी मधुकर सिसोदे, अमृत सुकदेव भामरे, रमेश भटा पाटील, सुनील मन्साराम पाटकरी, जगन्नाथ नारायण पाटील हे सदस्य हजर होते.

प्रथमच धनगर समाजाला चेअरमन पदाचा न्याय मिळाला. पॅनलचे सत्यजित सिसोदे, माजी जि.प.सदस्य जितेंद्र सिसोदे, माजी सरपंच उपेंद्र सिसोदे, दिनेश गुलाबराव पाटील, ग्रा.पं.सदस्या ज्योती दिनेश पाटील, माजी सरपंच शिवप्रिया सिसोदे, कल्पना उपेंद्र सिसोदे, मनीषा जितेंद्र सिसोदे, माजी तंटामुक्त अध्यक्ष ओंकार सिसोदे, जिजाबराव सिसोदे, गणेश मोरे, पंढरीनाथ सिसोदे, पीरन सिसोदे, अनिल सिसोदे, युवराज भामरे, अजय भामरे, पांडुरंग मराठे, पवन भामरे, वसंत भामरे, जिजाबराव पाटील, रवींद्र भामरे, हिरामण बागुल, ग्रा.पं. सदस्य निखिल सिसोदे, विनीत सिसोदे, रंजन पाटील, सनी सिसोदे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...