आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:देवेंद्र फडणवीस यांचा येत्या आठवड्यात मोठा घोटाळा बाहेर काढणार, राष्ट्रवादीचे अनिल गोटे यांचा इशारा

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मला विधानसभेत पाडण्यासाठी 14 कोटी रुपये दिले, गोटेंचा आरोप

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा येत्या आठवड्यातच मोठा घोटाळा बाहेर काढणार आहे. या घोटाळ्याने राज्यातच नव्हे तर देशात हादरे बसतील व दोंडाईचाच्या आमदारास ३१ डिसेंबरपर्यंत आत घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी दिला.

माजी महसूलमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांचा शिरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बाेलत होते.

मला विधानसभेत पाडण्यासाठी 14 कोटी रुपये दिले

अनिल गोटे म्हणाले, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मला विधानसभेत पाडण्यासाठी १४ कोटी रुपये दिले. एवढेच नव्हे तर एमआयएमच्या उमेदवाराला दोन कोटी रुपये दिले. हे खोटे असेल आणि हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. एमआयएमचा आमदार निवडून आला तरी चालेल मात्र गोटे निवडायला नको हीच भूमिका त्यांची होती, असाही आरोप त्यांनी केला

.