आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मूकबधिर विद्यालयामध्ये धागा संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप

धुळे18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरानजीक असलेल्या जुन्नेर येथील राऊळ खानाेलकर निवासी मूकबधिर विद्यालयात धागा सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील ६० विद्यार्थ्यांना वही, पाटी, पुस्तके, रंग व कलाकृतीसाठी वस्तू असे एकूण २६ प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची मदत दिली गेली.

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक परिस्थितीमुळे कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी असे उपक्रम राबवत आहोत आणि कोणताही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी धागा सेवाभावी संस्था सदैव प्रयत्नशील आहे, असे संस्थेचे अध्यक्ष सर्वेश पारोळेकर यांनी सांगितले. या उपक्रमासाठी प्रज्ञा मोरे, युक्ता कचवे आणि जुगल मंदान यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. विद्यालयाचे संचालक मंडळ, वसतिगृह अधीक्षक आप्पा कुंवर, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि कर्मचारी यांनी संस्थेचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...