आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजी:धनगर समाजाला निधी द्यावा नाही तर आंदोलन; धनगर समाज महासंघाचे अॅड. चिमण डांगे यांचा इशारा

धुळे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती लागू करून एक हजार काेटी देण्याची घाेषणा केली हाेती. मात्र, युती सरकारने हा निधी दिला नाही. महाविकास आघाडीची सत्ता असतानाही निधी मिळाला नाही. दाेन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले. निधी मिळावा यासाठी धनगर समाज महासंघातर्फे राज्यभरात आंदाेलन करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. चिमण डांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. चिमण डांगे यांनी सांगिततले की, दीड वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण राज्यात दाैरे केले आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेत आहे. त्याची सुरुवात धुळ्यातून झाली. गेल्या २५ वर्षांपासून महासंघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न साेडवण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, काेणत्याही सरकारने प्रश्न सोडवलेले नाही. समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे कुणीही लक्ष देत नाही. आदिवासी समाजाच्या सर्व सवलती व १ हजार काेटी रुपये देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हाेते. मात्र, आजपर्यंत एक हजार रुपयेही मिळालेले नाही. मेंढपाळांना मेंढ्या चारण्यासाठी असलेल्या जागेवर आदिवासींकडून अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी केला.

एकाही सरकारने शिफारस दिली नाही
घटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी १९८९ मध्ये राज्य सरकारने शिफारस केली. त्यानंतर १९८१ मध्ये ही शिफारस रद्द करण्यात आली. त्यानंतर एकाही सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा यासाठी शिफारस केली नाही. झारखंडमध्ये सरकारने शिफारस केल्याने तेथे समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यात आल्या असल्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ.
डांगे म्हणाले.

एकीकरण बैठकीला जामकर, पडळकर गैरहजर
निवडणुकीच्या काळात काही जण विविध संघटना काढून फायदा करून घेतात. त्यामुळे समाजाचे नुकसान हाेते. याबाबत अॅड.डांगे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पुणे येथे समाजातील ३२ ते ३३ संघटनांना एकत्र करण्यासाठी बैठक घेतली. त्या वेळी गाेपीचंद पडळकर व महादेव जानकर वगळता इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित हाेते असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...