आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा चढला:धुळे @ 42 अंशांवर; सकाळी १० वाजेपासून चटके, नागरिकांनी उष्माघात‎ टाळण्यासाठी सुती कपडे, टोपी, छत्री वापरावी

धुळे‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या वातावरणात सातत्याने‎ बदल घडत आहेत. मागील‎ आठवड्यापर्यंत अवकाळी‎ पावसाचा धुमाकूळ सुरू होता.‎ त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत‎ तपमानात प्रचंड वाढ होऊन पारा ४०‎ च्या पार जाऊन ४२ अंशांवर गेला‎ आहे. यामुळे मे हीटचा तडाखा‎ जाणवण्यास सुरुवात झाली आहे.‎

बुधवारी तर सकाळी १० वाजे‎ पासूनच चटके जाणवत होते. म्हणून‎ उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी‎ कामा शिवाय बाहेर पडू नका, असा‎ सल्ला आरोग्य विभागाकडून‎ नागरिकांना देण्यात आला आहे.‎ जिल्ह्याच्या वातावरणात मार्च‎ महिन्यापासून दोलायमान स्थिती‎ आहे. बेमोसमी पावसामुळे‎ जिल्ह्यातील वातावरण सातत्याने‎ बदलत राहिले.

मार्च व एप्रिल‎ महिन्यात ढगाळ हवामान आणि‎ अवकाळी पावसामुळे ऐन‎ उन्हाळ्यात पावसाळ्या सारखी‎ स्थिती निर्माण झाल्यामुळे तापमान‎ ३० अंशांपर्यंत खाली आले होते.‎ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी‎ १० ते १६ मे दरम्यान हवामान कोरडे‎ राहील, असा अंदाज वर्तवला आहे.‎ त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी‎ घेणे आवश्यक आहे.‎

त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा‎. उन्हाळ्यात मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळावीत,‎ उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. त्रास होत‎ असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.‎ -डॉ. नंदकिशोर पिंपळीस्कर,फॅमिली फिजिशियन‎

उन्हाळ्यात काय करावे‎

  • नागरिकांनी उन्हाची झळ कमी‎ करण्यासाठी तहान लागताच‎ पुरेसे पाणी प्यावे.
  • बाहेर पडताना‎ सौम्य रंगाचे, सैल, सुती कपडे‎ वापरावेत,
  • उन्हात जाताना टोपी,‎ छत्री आणि गॉगलचा वापर‎ करावा,
  • घर नेहमी थंड राहील,‎ याची काळजी‎ घ्यावी,
  • अशक्तपणा आला‎ असेल, तर त्वरित डॉक्‍टरांचा‎ सल्ला घ्यावा,
  • ओआरएस‎ पावडर, लस्सी, लिंबूपाणी,ताक‎ आदी प्यावे.
  • उष्माघाताचा धोका‎ टाळण्यासाठी दुपारी १२ ते ४‎ वाजेच्या दरम्यान उन्हात फिरू‎ नये.‎