आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:धुळेसह दाेंडाईचा बाजार समिती प्रारूप यादी प्रसिद्ध

धुळे3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे व दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दाेन्ही बाजार समितीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात. धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत दीड ते दाेन वर्षांपूर्वी संपली. काेराेनामुळे निवडणूक झाली नाही. आता समितीवर प्रशासक आहे.

दाेंडाईचा बाजार समिती आमदार जयकुमार रावल यांच्या ताब्यात आहे. त्यांचे समर्थक व भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील प्रशासक आहे. दोन्ही बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार २१ नोव्हेंबरला सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली. यादीवर ३० नाेव्हेंबरपर्यंत जिल्हा उपनिबंधकांकडे हरकती दाखल करता येतील.

हरकतींवर ३० नाेव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान सुनावणी होईल. त्यानंतर १४ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. ही प्रक्रिया झाल्यावर ४५ दिवस आधी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या अथवा फेब्रुवारीत निवडणूक हाेण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...