आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुक्त:धुळे ठरले महाराष्ट्रातील पहिले कोरोनामुक्त शहर, आता जिल्हाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळयातील कोरोनाचा नेमका स्ट्रेन कोणता? या प्रश्नानाने राज्याचे लक्ष वेधून घेणारे धुळे शहर राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे. याशिवाय गेल्या दोन महिन्यांत कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. शहरापाठोपाठ धुळे जिल्ह्यातील तीन तालुकेदेखील कोरोनामुक्तीच्या दिशेने आहेत. त्यामुळे शहरानंतर जिल्हादेखील कोरोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

धुळे शहरात २५ जुलै रोजी शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. नंतर ३ ऑगस्टपासून एकही नवीन रुग्ण नाही. गेल्या दोन महिन्यांत कोणत्याही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. यापूर्वी ८ जून रोजी ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. कोरोनाने मृत्यू झालेला शहरातील तो शेवटचा रुग्ण होता.

३१ डिसेंबर २०२० रोजी शहरात सर्वाधिक १११ रुग्ण बाधित होते. यानंतर ही संख्या कमी झाली. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी शहरातील बाधितांची संख्या ५३ होऊन हा आकडा वाढत होता. २५ जुलै रोजी ही संख्या शेवटच्या एका रुग्णावर येऊन थांबली. नियमांची अंमलबजावणी, लसीकरण व प्रशासनाचे एकत्रित प्रयत्न यामुळेच धुळे राज्यातील पहिले कोरोनामुक्त शहर ठरले आहे.

कोरोनामुक्तीसाठी २८ दिवसांचा निकष
एखाद्या शहर-गावात सलग २८ दिवस एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही किंवा कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही तर तो ग्रीन झोन म्हणून जाहीर केला जातो. त्यानुसार, हे शहर किवा गाव कोरोनामुक्त ठरते.

एकत्रित प्रयत्नांना यश
धुळे शहरातील कोरोनामुक्तांची संख्या शून्य झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाचे ते यश आहे. शहरापाठोपाठ तीन तालुकेही कोरोनामुक्त झाले आहे. -डॉ. विशाल पाटील, नोडल अधिकारी, धुळे

बातम्या आणखी आहेत...