आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता वाढली:बालकही ठरू शकतात स्प्रेडर; 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांमध्येही कोरोनाची लक्षणे

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती; आता अधिक काळजी घेण्याची गरज, ज्येष्ठांनाही जपा

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षीत असलेले बालक आता कोरोनाचा कचाट्यात सापडता आहे. बालरोग तज्ञांकडे कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या बालकांची संख्या मागील पंधरा दिवसात वाढली आहे. शिवाय अशा संशयित बालकांच्या तपासण्या केल्यानंतर कोरोनाचे अहवालही पॉझिटिव्ह येत आहे. काही बालके बाधित असले तरी त्यांच्यात लक्षणे नसल्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरू शकतात अशी चिंता बालरोग तज्ञ डॉ. अभिनव दरवडे यांनी व्यक्त केली. शहरासह जिल्ह्यात रोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. रोज पाचशे पेक्षा अधिक कोरोना संक्रमित आढळून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. शिवाय मागील वर्षी कोरोनाच्या पीक कालावाधीत लहान बालकांमध्ये लक्षण आढळली नव्हती. तसेच बालकांना सक्रंमण झालेले नव्हते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान बालके कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहे.

एवढेच नव्हे तर बालकांमध्ये कोरोनाची लागण झपाट्याने होते आहे. मागील पंधरा दिवसात बालरोग तज्ञाकडे लहान मुलांमध्ये हायग्रेड फिव्हर, लूज मोशन, अशक्तपणा, सर्दी होणे अशी लक्षणे आढळून येत आहे. तीन ते चार दिवसात लुझ मोशन कमी होतात. अशक्तपणा कमी होण्यास मात्र आठवडा लागतो. पूर्वी साधारण लक्षणाचे दोन किंवा तीन रुग्ण येत होते. मात्र, आता सहा ते बारा वर्ष वयोगटातील लक्षणे असलेल्या बालकांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. त्यात प्रामुख्याने हायग्रेड फिव्हर असलेल्या बालकांची संख्या अधिक आहे. अशा बालकांची तपासणी केल्यानंतर बालक कोरोना पॉझेटिव्ह आढळत आहे. सुदैवाने बालकांना प्रौढांप्रमाणे श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तदाब कमी होणे, छातीत कफ होणे असा त्रास होत नाही.

शिवाय बालकांना आॅक्सीजन किंवा व्हेंटीलेटरची गरज भासत नाही. लूज माेशन, पोट दुखणे, अंग दुखणे, डायरीया सारखे लक्षणे असल्यामुळे ते लवकर बरे होत आहे. थकवा आठवडाभराच्या उपचारानंतर जातो. बालकांवर प्रौढ व्यक्तीप्रमाणे उपचार करण्याची गरज भासत नाही. बालकांमध्ये आढळणाऱ्या सौम्य लक्षणाकडे दुर्लक्ष केले तर बालके सुपर स्प्रेडर ठरु शकतात. त्यामुळे वेळीच त्यांच्यावर उपचार करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला.

अशी घ्यावी काळजी
मुले घराबाहेर खेळण्यासाठी जातांना पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. बालकांना मास्क घालूनच घराबाहेर पाठवावे, गर्दीत जाणे टाळावे तसेच घरी आल्यानंतर आधी हात स्वच्छ धुण्याची सूचना मुलांना करावी. मुलांनी हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरचा वापर करावा. मुलांना किरकोळ आजार असला तरी त्याकडे दुर्लक्ष करु नये, आजार अंगावर न काढता त्वरीत तपासणी करुन घ्यावी.

पालकमंत्री घेणार अाढावा
जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार उद्या शनिवारी जिल्हा दाैऱ्यावर येत अाहे. ते दुपारी साडेबारा वाजता गुलमाेहाेर शासकीय विश्रामगृहात येतील. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत काेराेना अाढावा बैठक हाेणार अाहे. त्यानंतर ते दुपारी ३ वाजता ते दाेंडाईचा येथे भेट देवून तेथील कायदा व सुव्यवस्थेचा अाढावा घेणार अाहे.

२० ते ३० टक्के प्रमाण
मागील वर्षीच्या कोरोना लाटेत बालक बाधित होण्याचे प्रमाण नगण्य होते. मात्र, आता हे प्रमाण बऱ्यापैकी वाढले आहे. जे मुल बाहेर फिरतात, खेळण्यासाठी, ट्युशनसाठी जातात. त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. पूर्वी १०० मुले तपासल्यानंतर पाच ते सहा जणांना त्रास होत असल्याचे आढळून आले होते. मात्र, आता हे प्रमाण २० ते ३० टक्के आहे. बालकांमध्ये कोरोनाचे संक्रमण दिसत असले तरी बालके अधिक क्रिटीकल होण्याचेसंकट नाही. मुलापासून परिवारातील सदस्यांना संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे.- डॉ.अभिनव दरवडे,बालरोगतज्ञ

या धोक्याकडे लक्ष द्यावे
काेरोनाचा संक्रमण मोठ्या प्रमाणात हाेत असतांना शहरात काही प्लेग्रुप, नर्संरी सुरु आहे. तसेच खासगी ट्युशन्स सुरु आहे. याशिवाय शेंडी, जाऊळ,मुंज सारखे कार्यक्रम व लहान मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरे होत आहे. कॉलन्यांमध्ये लहान मोठे उद्यानाही सुरू आहे. या ठिकाणी मुल खेळत असतात. या ठिकाणावरुन बालकांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरु शकते. त्यामुळे यावर निर्बंध लावणे आवश्यक आहे. शिवाय ग्रामीण भागात पाचवीपासूनचे वर्ग सुरु आहे. याविषयाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...