आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे जिल्ह्यातल्या साक्रीमध्ये एक भीषण घटना घडलीय. एका मित्राने थट्टेच्या नादात आपल्या मित्राच्या गुप्तांगामध्ये (गुदद्वार) एअर हायड्रॉलिक प्लास्टिक पंपने हवा भरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तुषार निकुंभ (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तुषार निकुंभ यांच्या वडिलांनी याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर तुषारचा मित्र हर्षल जाधव या तरुणाला निजामपूर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्यात.
नेमके प्रकरण काय?
तुषार आणि हर्षल हे मित्र आहेत. ते धुळ्यातल्या छडवेल शिवारातल्या सुजलॉन कंपनीत नोकरी करतात. या ठिकाणी इंटी्ग्रेटेड इंजिनिअर सर्व्हिसिंगचे काम चालते. कर्मचाऱ्यांच्या कपड्यावर आणि शरीरावर धातूचे कण बसतात. ते हटवण्यासाठी त्यांना एअर प्रेशर पंप दिलाय. काम संपले की सारेच कर्मचारी या पंपच्या मदतीने अंगावरील धूळ काढायचे.
मग काय झाले?
तुषार आणि हर्षल दोघांचेही नेहमीप्रमाणे काम संपले होते. तुषार अंगावरील धूळ काढण्यासाठी गेला. तेव्हा हर्षलने त्याच्याशी थट्टा मस्करी सुरू केली. या मस्करीनेही अतिरेक केला. बेभान झालेल्या हर्षलने तुषारच्या गुप्तांगामध्ये (गुदद्वार) एअर हायड्रॉलिक प्लास्टिक नळीने हवा भरली. त्यामुळे तुषारचा मृत्यू झाला.
रुग्णालयात नेले, पण...
तुषारला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर गुजरातमधल्या सुरतमध्ये हलवण्यात आले. मात्र, त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. शरीरात हवा भरल्याने तुषारच्या पोटातील अवयवांना गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही. याप्रकरणी तुषारचा मित्र हर्षल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र, केवळ विचित्र थट्टेतून मित्राचा जीव घेतल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.