आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत धुळे जिल्ह्याने २६० गुण मिळवत उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत व्हॉलिबॉल खेळात १४ वर्षे वयोगट विजेता आमळी, १७ वर्षे मुली विजेता आमळी, वरसुस, शिरसोले तर १७ वर्ष विजेता रोहड व राईनपाडा आश्रम शाळा, हॅन्ड बॉल खेळ प्रकार १४ वर्ष वयोगट मुले विजेता वारसा, जैताने, इंदवे, तर मुली वारसा, इंदवे रिले ४ बाय १०० विजेता वाघाडी, मुले १४ वर्ष वयोगट तर १७ वर्ष वयोगट ४ बाय १०० रिले मुली विजेता इंदवे, उप विजेता प्रकल्पाचे संघ कबड्डी १९ वर्ष खो खो मुले, १९ वर्ष व्हॉलीबॉल, १९ वर्ष मुले व मुली, रिले ४ बाय १००मध्ये १७ मुले व मुली तर १९ मुली ४ बाय ४०० असे ७ विजेता व ७ उपविजेता मिळून १४ संघांनी प्रावीण्य प्राप्त केले. तर वैयक्तिक खेळ प्रकारात धावणे, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, लांब उडी, उंच उडी, चालणे या खेळ प्रकारात प्रकल्पाला सुवर्णपदक प्रथम १६, रजेत द्वितीय मेडल ११, कांस्य तृतीय मेडल १३ असे वैयक्तिक खेळ प्रकारात ४० पदक प्राप्त केले.
सांघिक खेळ प्रकल्पा ७ आश्रम शाळांना ७ विजेता चषक तर ७ उपविजेता चषक तर धुळे प्रकल्प कार्यालयाला सर्व साधारण उपविजेता चषक पटकावला. विजेता संघांना आदिवासी विकास विभागाचे आयुक्त नयना गुंडे, महाराष्ट्र पोलिस अकॅडमी नाशिकचे संचालक अनिता पाटील, अपर आयुक्त तुषार माळी, अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा धिकरी तृप्ती धोडमिसे धुळे, विशाल नरवाडे कळवण, जितीन रहमान नाशिक, मंदार पत्की तळोदा, उपायुक्त सुदर्शन नगरे, अविनाश चव्हाण, प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यावल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील नाशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे नाशिक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिलीप मोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
साधारण विजेता चषक कळवण प्रकल्पाला तर उपविजेता चषक धुळे प्रकल्पाला तर तृतीय चषक नाशिक प्रकल्पाला देण्यात आले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर, प्रशासन पी. के. ठाकरे, भटू आव्हाड, विजय भडगावकर, अविनाश पाटील, सचिन चौधरी, सुनील पाटील, सतीश काकड, जयश्री देवरे, सुनील पाटील, विजय खैरनार, आरिफ शेख, संजीव देसाई, चंद्रशेखर बच्छाव, हर्षल अहिरे, राजेंद्र जगताप, प्रकाश मोहणे, नितीन गांगुर्डे, अजय चौधरी, विजय मारनर, मनोज निकम, स्वप्निल पाटील, सुधीर आकलाडे, चेतन महाले, दीपक गोसावी, आर. पी. सोनवणे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांनी सहकार्य केले.
२८०० खेळाडू सहभागी
आश्रमीय विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये नाशिकसह कळवण, राजूर, धुळे, यावल, नंदुरबार, तळोदा आदी ७ प्रकल्पातील जवळपास २ हजार ८०० खेळाडू विविध सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारात सहभागी झाले. धुळे प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील शासकीय अनुदानित आश्रम शाळा, एकलव्यसह ५८ आश्रम शाळांपैकी ३० आश्रमशाळांचे २०३ मुले २०१ मुली असे ४०४ खेळाडूंसह जवळपास प्रकल्पाचे ३२ संघ व्यवस्थापक सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.