आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:धुळ्यात झाली मृतदेहांची अदलाबदल; अनोळखी मृतदेहावर केले अंत्यसंस्कार

धुळेएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जापीच्या कुटुंबीयाने चेहरा पाहिल्याने झाला उलगडा

काेरोनाच्या भीतीने मृत्यूनंतर चाचणी घेण्यात आलेल्या दोघांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला; परंतु त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांना मृतदेह सोपवताना नजरचुकीने मृददेहांची अदलाबदल झाली. परिणामी, एकाच्या मृतदेहावर दुसऱ्याच्या कुुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

धुळे तालुक्यातील जापी-शिरढाणे व सोनगीर या गावातील दोघांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे दोघांना हिरे रुग्णालयात आणले होते; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय प्रशासनाने मृतांच्या नाक व घशातील द्रवाचे नमुने घेतले. तपासणीनंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्याची वेळ आली. त्या वेळी शवगृहात असलेल्या जापी येथील व्यक्तीचा मृतदेह सोनगीरच्या मृत कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. काही वेळाने जापी येथील नागरिकही आले. त्यांना सोनगीर येथील व्यक्तीचा मृतदेह देण्यात आला. सोनगीर येथील नागरिकांनी गावी येताच मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले.

...तर टळला असता प्रसंग

दोन्ही मृत व्यक्तींच्या नामसाधर्म्य आहे. जापी येथील वृद्धाचा मृतदेह घेण्यासाठी नागरिक आले होते. परंतु खासगी रुग्णवाहिका चालकांनी नकार दिला. त्यामुळे सकाळपासून नागरिक रेंगाळले. दुपारी दोघांचे नातलग सोबत आले. त्याच वेळी धांदल उडून दुर्दैवाने मृतदेहाची अदलाबदल झाली.

बातम्या आणखी आहेत...