आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे:कोरोनाग्रस्त तरुणीची लेकीसारखी काळजी; मायेची परतफेड म्हणून तिच्या वडिलांनी देऊ केलेले 10 लाख रु. नाकारले

धुळे / गणेश सूर्यवंशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • धुळे रुग्णालयातील आरोग्य निरीक्षक सुनील पुंड यांनी जागवली माणुसकी

कोरोनाच्या बाधेमुळे १९ वर्षीय अनघा (काल्पनिक नाव) हिरे रुग्णालयात उपचार घेत हाेती. कुटुंबीयही क्वाॅरंटाइन असल्याने घरचे, जवळचे, मायेचे असे कुणीच नसल्याने तिची तगमग सुरू हाेती. हीच मनाची घालमेल आेळखून आराेग्य निरीक्षक सुनील पंुड यांनी तिला आपल्या पाेटच्या मुलीसारखे जपले. तिची अहाेरात्र सेवा केली. स्वत:च्या घरून डबा आणून आपल्या हातांनी घास भरवले. वडिलांच्या प्रेमाची माया देणाऱ्या आराेग्य निरीक्षकांच्या काळजीमुळेच तिला या संकटावर मात करता आली. माेठ्या संकटातून बाहेर आलेल्या आपल्या मुलीला पाहताच वडिलांसाठी गगन ठेंगणेे झाले. आपल्यासारखी माया लावलेल्या आराेग्य सेवकांचे त्यांनी आभार मानले. याच मायेची परतफेड म्हणून दहा लाख देऊ केले. मात्र, याच पैशाला नाकारून आपण स्वत:च्या मुलीसारखी तिची सेवा केल्याच्या समाधानरूपी भावना त्यांनी व्यक्त केल्या. शासकीय कर्तव्य हीच माझी पावती असल्याचे सांगत निरीक्षक पुंड यांनी तेवढ्याचे नम्रतेने काेरोनामुक्त अनघाच्या वडिलांना नकार दिला.

अनघा कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तिचे कुटुंबीय क्वाॅरंटाइन होते. त्यामुळे ती रुग्णालयात एकटीच उपचार घेत हाेती. इच्छा असूनही कुटुंबीयांना तिच्यापर्यंत पोहोचण्याची कोणतीही संधी नव्हती. एकीकडे अनघा उपचार घेत होती. दुसरीकडे कुटुंबीय तिची काळजी करत होते.

काेराे चेक समाेर धरला : मुलगी बरी झाल्याने घरी आणण्यासाठी तिचे वडील रुग्णालयात आले. एका शब्दावर अनघाची काळजी घेणाऱ्या सुनील पुंड यांना त्यांनी गाठले. तुमच्यामुळेच अनघा सुखरूप आहे. आमच्या कुटुंबासाठी तुम्हीच देवदूत आहात, असे म्हणत त्यांनी मोबाइलचे गुगल पेमेंटवरील आपले बँक अकाउंट तसेच चेक समोर धरला. या खात्यात दहा लाख रुपये आहेत. अनघासाठी ते साठवले. वाटेल तेवढे काढून घ्या, पण नाही म्हणू नका, असे म्हणत त्यांनी आरोग्य निरीक्षक पुंड यांच्यासमोर डिजिटल पे व प्रत्यक्षात धनादेशाचा पर्याय ठेवला. परंतु दोन्ही हात जोडत तेवढ्याच विनम्रतेने सुनील पुंड यांनी नकार दिला.

बक्षिसापेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ
अनघाला स्वत: रुग्णालयात आणले होते. इतर जबाबदारी सांभाळून तिची काळजी घेतली. घरून येणारा जेवणाचा डबाही नियमित तिच्यापर्यंत पोहोचवला. त्यामागे कोणताही स्वार्थ नव्हता. मुलीप्रमाणे नव्हे तर माझ्या मुलीचीच मी देखभाल केली, असे म्हटले तर अधिक योग्य ठरेल. बक्षिसाच्या रकमेपक्षा शासकीय कर्तव्यातून मिळणारे समाधान उच्च कोटीचे आहे. - सुनील पुंड, आरोग्य निरीक्षक, हिरे रुग्णालय धुळे.

बातम्या आणखी आहेत...