आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असल्याने युनिसेफ, महिला बालविकास विभाग आणि सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबवले जाते आहे. या अभियानांतर्गत अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी आम्ही कमी वयात लग्न करणार नाही असा संकल्प केला. जनजागृती सुरू झाल्यावर चाइल्ड लाइनच्या हेल्पलाइनवर १३ जणांनी बालविवाहाची तक्रार केली. त्यामुळे बालविवाह रोखण्यात यश आले. जनजागृतीच्या चळवळीत धुळे जिल्हा राज्यात आघाडीवर आहे.
जिल्ह्यातील ज्या गावांत बालविवाहाचे प्रमाण जास्त आढळले त्या गावात सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेमार्फत बालविवाह विषयक जनजागृती मोहीम झाली.
या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आढावा समिती, युनिसेफच्या पूनम कश्यप, प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, नंदू जाधव व सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा मीना भोसले यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार १२५ शाळेतील विद्यार्थ्यांना बालविवाहामुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली. अभियानांतर्गत २४ हजार ८६३ पालक व २५ हजार १२२ विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले.
शिक्षण घ्यायचे आहे, विवाह करायचा नाही
प्रशिक्षण व समुपदेशन झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः १०९८ या हेल्पलाइनवर फोन करून बालविवाह रोखण्याचे धाडस दाखवले. जनजागृती मोहिमेसाठी समन्वयक प्रतीक्षा मगर, ललिता अहिरे, सुनीता चौरे, छाया भदाणे, तेजश्री जगदाळे, संगीता पाटील, अलका थोरात, ज्योती परदेशी, शीतल भोकरे, मीना भोसले, हिरालाल भोसले, नंदू जाधव, युनिसेफचे जिल्हा प्रकल्प समन्वयक नंदू जाधव, विशाल साळुंखे आदींनी प्रयत्न केले.
बालवयात विवाह न करण्याचे पटले महत्त्व
विद्यार्थ्यांना बालवयात विवाह न करण्यासह शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. कमी वयात विवाह केल्याने होणारे नुकसान लक्षात आल्याने कमी वयात विवाह करणार नाही अशी प्रतिज्ञा केलेल्यांपैकी १३ जणांनी १०९८ या चाइल्ड लाइन हेल्पलाइनवर विवाहाची तक्रार केली. त्यामुळे हे बालविवाह रोखण्यात यश आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.