आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाला आळा:12 ते 14 वयोगट लसीकरणात धुळे राज्यात दहाव्या क्रमांकावर; जिल्ह्यात दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 62 टक्के

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू होऊन १५ महिने पूर्ण झाले. या काळात १५ वर्षांवरील ६२.६९ टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. पहिला डोस घेतल्यानंतर रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झालेले मजूर गावाकडे परत येत असल्याने त्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रित झाले आहे. त्यासाठी विशेष लसीकरण शिबिर होते आहे. याशिवाय १७ मार्चपासून १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचे शाळानिहाय लसीकरण सुरु आहे. या वयोगटाच्या लसीकरणात धुळे जिल्ह्याचा राज्यात दहाव्या क्रमांकावर आहे. सात दिवसांपासून मुलांचे लसीकरण वाढले आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यातील १७ हजार ३१० आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर १६ हजार ७८९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ३ हजार ९१७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुस्टर घेतला. जिल्ह्यातील सर्व ३३ हजार ५०२ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी पहिला तर ३२ हजार ५०२ म्हणजे ९६.४१ टक्के कर्मचाऱ्यांनी दुसरा तर ३ हजार ७५६ जणांनी बुष्टर घेतला. ६० वर्षांवरील २ लाख २९ हजार ५६५ म्हणजेच ८४.३१ टक्के नागरिकांनी पहिला, १ लाख ९६ हजार ८३६ म्हणजे ७२.२९ टक्के नागरिकांनी दुसरा तर १३ हजार ५५९ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला.

४५ ते ५९ वर्षे वयोगटात ३ लाख २३ हजार ११६ म्हणजे ८३.८० टक्के नागरिकांनी पहिला तर २ लाख ७४ हजार १८ जणांनी दुसरा डोस घेतला. तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १० लाख ५३ हजारापैकी ७ लाख ६४ हजार ५९२ जणांनी पहिला तर ५ लाख ८५ हजार ६५१ जणांनी दुसरा डोस घेतला. १५ ते १७ वर्षे वयोगटातील १ लाख १३ हजार ४४७ किशोरवयीन पैकी ६६ हजार ८५७ म्हणजे ५८.९३ टक्के जणांनी पहिला तर ४४ हजार ६५९ म्हणजे ३९.३७ टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...