आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘जल जीवन’मध्ये धुळे, शिंदखेड्यातील गावे ; पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे, शिंदखेडा तालुक्यातील बहुतांश गावांना पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे या गावांचा समावेश जल जीवन मिशनमध्ये करावा, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याकडे केली होती. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील काही गावांचा समावेश जल जीवन मिशनमध्ये झाला.

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत हर घर नल से जल या योजनेत ज्या गावांना पाण्याची भीषण टंचाई भासते त्या गावांचा समावेश खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रयत्नामुळे पहिल्या टप्प्यात करण्यात आला. या गावांमध्ये काम प्रगतिपथावर आहे. काही गावांत काम करण्यासाठी कार्यादेश निघाले आहे. दुसऱ्या टप्प्यात धुळे व शिंदखेडा तालुक्यातील कापडणे, सोनगीर, फागणे, बोरीस, शिरडाणे प्र.नेर, दुसाणे, निमगूळ, बेटावद आदी गावांचा समावेश या योजनेत करावा, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याकडे केली होती. त्यानुसार दोन्ही तालुक्यातील काही गावांचा जल जीवन मिशनमध्ये समावेश झाला आहे. कापडणे, सोनगीर येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलशुद्धीकरण केंद्रास मंजुरी मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू होईल, अशी माहिती खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी दिली.

या गावांसाठी योजना मंजूर
धुळे तालुक्यातील आर्वी, बाबरे, बोरकुंड, बुरझड, चिंचवार, देवभाने, देऊर खु., हेंकळवाडी, जापी, कापडणे, कुंडाणे, कुसुंबा, लामकानी, मेहेरगाव, मोहाडी प्र.डां, मोरदड, मुकटी, नगाव बु., न्याहळोद, रतनपुरा, शिरडाणे प्र.नेर, सोनेवाडी, तांडा कुंडाणे, विश्वनाथ, अंबोडे, बोरसुले, गरताड, नंदाळे खु., निमडाळे, सावळीतांडा, अंचाळेतांडा, बेंद्रेपाडा, भदाणे, बोरीस, देऊर बु., धनूर, फागणे, गोताणे, हेंद्रुण, जुनवणे, जुन्नेर, जुनवणे, काळखेडे, कौठळ, कापडणे, खेडे, खोरदड, कुंडाणे (वेल्हाणे), लळिंग, लोहगड, नगाव खु., नाणे, नवलाणे, नावरी, पाडळदे, पिंपरखेडे, सडगाव, सातरणे, सौंदाणे, सायने, शिरडाणे प्र.डां, सिताणे, सोनगीर, तिखी, उभंड, उडाणे, वडजाई, वणी बु., विंचूर, वार या गावांचा तर शिंदखेडा तालुक्यातील अजंंदे, अमळथे, आरावे, चिमठाणे, मुडावद, पडावद, सुलवाडे, वणी या गावांचा समावेश झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...