आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जलजागृतीसाठी वॉटर रनमध्ये धावले धुळेकर; शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी नोंदवला सहभाग

धुळे2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे बुधवारपासून जलजागृती सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त जलसंवर्धनासाठी शहरात वॉटर रनचे आयोजन करण्यात आले. या वॉटर रनमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग नोंदवला.

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या वतीने पर्यावरण संतुलनासाठी जलस्रोतांचा कार्यक्षम वापर आणि लोकसहभागातून पाण्याचे एकात्मिक व्यवस्थापन तर जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. याअंतर्गत शहरात वॉटर रनचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात या वॉटर रनचे उद्घाटन झाले. यावेळी अधीक्षक अभियंता एस.एस.खांडेकर यांनी जलजागृतीबाबत प्रबोधन केले. जनजागृती सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जलदूत होत या पाण्याची बचत काळाची गरज असल्याचे सांगितले. या वेळी उपकार्यकारी अभियंता ए.एस.पाटील, उपवनसंरक्षक एम.एस.भोसले,प्र.ना.हापसे, कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील, कार्यकारी अभियंता आर.डी. खैरनार,एकांश बच्छाव, प्रणती बच्छाव सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...