आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निविदा:धुळेकरांचा प्रवास खड्ड्यातूनच, कारण पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या डागडुजीसाठी निविदाच झाली नाही प्रसिद्ध

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१० दिवसांवर पावसाळा आला तरी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण तर दूरच साधे खड्डेही बुजवण्यात आलेले नाही. धक्कादायक म्हणजे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात येते, ती अद्यापही प्रसिद्ध झालेली नाही, मान्सून दाराशी येऊन उभा आहे, आता निविदा केव्हा निघेल व रस्त्यांची केव्हा दुरुस्ती होईल? त्यामुळे यंदा धुळेकरांना पावसाळ्यात खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागेल, अशी चिन्हे आहेत. देवपुरातील नकाणे रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही. तसेच जयहिंद चौकातून झेड. बी. पाटील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. जुन्या मुंबई-आग्रा रस्त्याची स्थिती याहून वेगळी नाही. आग्रा रस्त्याच्या डांबरीकरणासाठी तीन वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयात प्रस्ताव पाठवला. पण हा प्रस्ताव अद्यापही मंजूर झाला नाही.

नकाणे रस्त्याचे उर्वरित काम पावसाळ्यानंतर स्वा. वि. दा. सावरकर यांचा पुतळा ते कुमारनगर पुलापर्यंत नकाणे रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्याची वाट लागली. काही दिवसांपासून खडीकरण सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. निम्म्या रस्त्याचे खडीकरण झाले असून उर्वरित सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण होणे शक्य नसल्याने डांबरीकरणाचा एक लेअर पूर्ण करून उर्वरित काम पावसाळ्यानंतर होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली.

वर्दळीच्या जयहिंद महाविद्यालय रस्त्याची चाळण देवपुरातील झेड. बी. पाटील महाविद्यालय ते जयहिंद कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवणेच काय तर पाणी चालणेही कठीण आहे. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, खासगी हॉस्पिटलसह अनेक वसाहती आहेत. हा रस्ता नकाणे रस्त्याला जोडणारा आहे. रस्त्याचे डांबरीकरण मंजूर झाले असले तरी अद्याप त्याला प्रारंभ झालेला नाही. सद्य:स्थितीत गटारीचे काम सुरू आहे. दहा दिवसात डांबरीकरण पूर्ण होईल, असा दावा यंत्रणेने केला आहे. पंधरा वर्षांनंतर रस्त्याचे काम होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...