आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटात वाद:धूलिवंदनाला साक्रीत दोन गटात झाला वाद, दोन्ही गटाच्या 40 जणांवर गुन्हा दाखल

साक्री2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री येथील चांदतारा मोहल्ला परिसरात धूलिवंदनाच्या दिवशी डीजे बंद करण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला. त्यातून तलवार, कोयता व गुप्तीने प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार एका गटाने दिली आहे. दुसऱ्या गटाने विनयभंगाचा आरोप केला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटाच्या सुमारे ४० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

धूलिवंदन साजरे होत असताना डीजे बंद करण्याच्या कारणावरून वाद झाला. याविषयी सुनंदा कैलास रामोळे (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, डीजे बंद करण्याच्या कारणावरून वाद घालण्यात आला. त्यानंतर सुमय्या शेख, अल्फिया जाकीर शेख, शबाना शेख फारुख, मैराज इब्राहिम अली सैय्यद, नासीर सुपडू शेख, इरफान सुपडू शेख, मोइनोद्दीन शेख शमसुद्दीन, निसार नसीब पठाण, समद सलीम शेख, जाकीर सुपडू शेख, सलीम शेख शमसोद्दीन यांच्यासह सुमारे १० जणांचा जमाव तलवार, कोयता, रॉड, गुप्ती व लाकडी दांडके घेऊन चालून आला. या जमावाने सशस्त्र हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या गटातर्फे २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार अनिता रवींद्र रामोळे, सुनंदा कैलास रामोळे, कैलास रामोळे, सौरभ रामोळे, अजय कैलास रामोळे, रवींद्र आेमकार रामोळे, सचिन संजय रामोळे, भटू राजेंद्र लाडे, चेतन आत्माराम लाडे यांच्यासह सुमारे दहा जणांचा जमाव चालून आला. त्यांनी रॉडने वार केल्यानंतर विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे तणाव निर्माण झाला होता

बातम्या आणखी आहेत...