आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुस्ती, खो-खोसह जिल्ह्यातील अनेक खेळाडू आता बॉक्सिंगकडे वळत आहे. खेलो इंडिया स्पर्धेमुळे काही बॉक्सिंगपटू राष्ट्रीय पातळीवर पोहाेचले. ग्रामीण भागातील काही बॉक्सिंगपटूंनी पदकही मिळवले. जिल्ह्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सिंगपटू तयार व्हावे यासाठी धून अभियान राबवण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार धून अभियानाच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती बॉक्सिंग क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षक भरत कोळी, धीरज पाटील प्रयत्न करतील.
जिल्ह्यातील बॉक्सिंगपटूंनी एक वेगळी छाप पाडली आहे. जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००८ पासून मयूर बोरसे, डॉ. एल.के. प्रताळे, मनोज चौधरी, विजेंद्र जाधव, भरत कोळी, अमोल शिरसाठ, सागर कोळी, ऋषिकेश अहिरे, धीरज पाटील, भूषण पवार, नूर तेली, दीपक ढोले, सुनील पावरा आदी बॉक्सिंगच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील काही बॉक्सिंगपटूंनी राज्य, राष्ट्रीय, अखिल भारतीय विद्यापीठ व खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळवली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष जय कवळी यांची धुळे व नंदुरबारसाठी खास बॉक्सिंग धून अभियान राबवण्याचे ठरवले आहे. अभियानातून शहरात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यात येतील. शहरात स्पर्धा होतील. बॉक्सिंगपटूंच्या शारीरिक व मानसिक मूल्यमापनासाठी विशेष उपाययोजना होतील. छत्रपती बॉक्सिंग क्लब हे अभियान राबवेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.